सुनिल काळे, मुंबई| ता. २४ मे २०२४
नुकताच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा ‘एससीईआरटी’ने जाहीर केला. यामध्ये राज्य मंडळांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मनाचे श्लोक, तसेच आराखड्यामध्ये मनुस्मृतीतील श्लोकाचा समावेश करण्याबाबतच्या सूचना दिल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. या निर्णयावरुन नवा वाद उभा राहिला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी याबाबत महत्वाचे विधान केले आहे.
काय म्हणाले शरद पवार?
मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मनुस्मृतीबाबतच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. "अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि मनाचे श्लोक समाविष्ठ करण्याचा विचार असल्याचे माझ्या वाचण्यात आले. यावरुन राज्य सरकारची काय मानसिकता आहे, हे लक्षात येते. मुलांच्या डोक्यात काय घालायचे सुरू आहे हे समजत नाही. पण जाणकरांनी याबाबत भूमिका घ्यायला हवी. हे धक्कादायक आहे," असे म्हणत शरद पवार यांनी या निर्णयाला विरोध केला.
रामदास आठवलेंचा निर्णयाला विरोध
तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनीही या निर्णयावरुन नाराजी व्यक्त केली. "मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळली होती. जर अभ्यासक्रमात मनुस्मृती येत असेल तर मी केंद्रातील नेत्यांसोबत बोलणार आहे," असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.
जितेंद्र आव्हाड संतापले
"मनुस्मृतीचा वापर करणे म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणे आहे. त्यात महिलांचा अपमान केला. आम्ही सांगत होतो की हे मनुस्मृती आणणार. मी विचार करतो की पुढील आठवड्यात महाडला जाऊन बाबासाहेब यांना वंदन करू आणि मनुस्मृती जाळू. तेंव्हा जातीभेद बाजूला ठेवून सामिल व्हा विरोध करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले.
दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानेही (सचिन खरात गट) या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. मनुस्मृतीमध्ये दलित आणि महिलांना अस्पृश्य लेखण्यात आले. त्यामुळे मनुस्मृती असमानतेचे प्रतीक आहे, शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक सामील करू नये, हा मनुस्मृतीचा अभ्यास त्वरीत मागे घ्यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.