राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. २० डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. मात्र अधिवेशनाचे दिवस वाढवण्याची मागणी विरोधकांनी केली होता. यावरुन राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून नागपुरात अनोखे स्वागताचे बॅनर लावत सरकारला चिमटा काढला आहे.
उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनासाठी नागपुरात आज महाराष्ट्र सरकारमधील सर्व नेते मंडळी दाखल होतील. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून स्वागत बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र या स्वागत बॅनर्सवर असणारा मजकूर हा राज्य सरकारला चिमटा काढणारा ठरतोय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
प्रत्यक्ष अधिवेशन हे दोन आठवड्यात असलं तरी कामकाज मात्र दहा दिवस चालणार आहे. याचाच उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. 'फक्त १० दिवस होणाऱ्या हिवाळी अधिवेशनानिमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत', अशा आशयाचे हे फलक विमानतळाहून बाहेर निघणाऱ्या मार्गावर लावण्यात आले आहेत. (Latest Marathi News)
या बॅनर्सवर शरद पवार तसेच राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे फोटो आहेत. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग यांच्यासह शहराध्यक्ष धनेश्वर पेठे आणि जिल्हाध्यक्ष राजू राऊत यांचे देखील फोटो आहेत.
हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. तर २० डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन सुरु असेल. एकूण १४ दिवस हे अधिवेशन असणार आहे. मात्र सुट्ट्या पाहिल्या तर प्रत्यक्ष अधिवेशनच्या कामकाजाचे १० दिवसच असणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.