Amol Kolhe
Amol Kolhe Saam TV

चर्चा तर होणारच! भाजप नेत्याच्या फर्मचं राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंच्या हस्ते उद्घाटन

अमोल कोल्हे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची जालन्यात भेट घेतल्याने पुन्हा एकदा विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.
Published on

जालना : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) गेल्या काही दिवसांपासून पक्षातील कार्यक्रम आणि मतदारसंघात फार सक्रीय दिसत नाही. पक्षातील अंतर्गत वादामुळे ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या आधी ते मोठा निर्णय घेऊ शकतात, अशाही शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यातच आज त्यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची जालन्यात भेट घेतल्याने पुन्हा एकदा विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.

केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे बंधू भास्कर पाटील दानवे यांच्या करेज इन्फ्रा प्रा.लि.जी कंपनीच्या ऑफिसच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन जालन्यात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील उपस्थिती लावली. मात्र अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात विविध चर्चाना उधाण आले आहे.  (Latest Marathi News)

Amol Kolhe
शेतकऱ्यांच्या वीज बिलाबाबतच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर फडणवीस स्पष्टच बोलले, ठाकरे सरकारवर फोडलं खापर

या कर्यक्रमाला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे यांनी ही उपस्थिती होती. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीत पक्षात अमोल कोल्हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू असताना अमोल कोल्हे यांची ही अचानक भेट झालेल्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

केंद्रीयमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे बंधू भास्कर दानवे हे जालना जिल्ह्याचे भाजप उपाध्यक्ष आहेत. अमोल कोल्हे आज जालन्याला रावसाहेब दानवे यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी प्रतीक दानवे यांच्या 'करेज' फर्मचे उद्घाटन केले. मात्र भाजप नेत्याच्या फर्मचं उद्घाटन अमोल कोल्हे यांनी केल्याने चर्चा तर होणारच. यावेळी रावसाहेब दानवे आणि अमोल कोल्हे यांच्यात ४० मिनिटे चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Amol Kolhe
अमित शाहांच्या मध्यस्थीनंतरही कर्नाटक सरकारचा आडमुठेपणा कायम, महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना परवानगी नाकारली

याआधी अमोल कोल्हे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांनंतर सूचक वक्तव्य केलं होत. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. उगाच आऊत खांद्यावर घेऊन आम्ही फिरत नाही तर वारा आणि आभाळ बघून शेत कधी नांगरायचं हे आम्ही ठरवत असतो, असं त्यांनी म्हटलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com