शेतकऱ्यांच्या वीज बिलाबाबतच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर फडणवीस स्पष्टच बोलले, ठाकरे सरकारवर फोडलं खापर

उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं आणि त्यांनी शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिली नाही, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
devendra Fadnavis
devendra Fadnavis saam tv
Published On

नागपूर : शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या मुद्द्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या भाषणात 'देवेंद्रजी जनाची नाही मनाची लाज बाळगा' अशी टीका केली होती. हिवाळी अधिवेशानाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांनी पुन्हा याबाबत विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) त्या व्हिडीओबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

माझा व्हिडीओ तुम्ही नीट पाहिला असता तर सगळं समजलं असत. तुम्ही संजय राऊतांसारखं करु नका, असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांना लगावला.

मध्य प्रदेश सरकारने कोविड काळात शेतकरी अडचणीत असल्याने कोविड काळातील वीज बिल वसुली रद्द केली होती. तशी महाराष्ट्राने करावी अशी मागणी मी तेव्हा केली होती. तशी वीज बिल वसुली तत्कालीन सरकारने रद्द केली का? असा सवालही त्यांनी विचारला. (Latest Marathi News)

devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीसांचा यू-टर्न; कृषीपंप वीजबिलाबाबत सत्तेबाहेर आणि सत्तेत असताना वेगळ्या भूमिका, सुप्रिया सुळेंचं ट्वीट

मध्य प्रदेश सरकारने वीज बिल वसुली पूर्ण थांबवलेली नाही. केवळ कोविड काळातील वीज बिल वसुली थांबवली होती. मात्र आज तो व्हिडीओ कितीही दाखवला तरी तेव्हा सरकार आमचं नव्हतं. तेव्हा उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं आणि त्यांनी शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिली नाही, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

devendra Fadnavis
CM Eknath Shinde : सोयरीक एकाशी आणि संसार दुसऱ्याशी थाटला; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांना टोमणा

मात्र आता आम्ही सांगितलं आहे. एक बिल जरी भरलं तरी शेतकऱ्यांची वीज तोडली जाणार नाही. त्यापलिकडे आणखी एक आदेश काढला आहे. सध्या रबीचा हंगाम सुरु आहे. शेतकऱ्यांचं खरीपात नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांचं वीज कनेक्शन कापू नये, असे आदेश काढल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com