Sharad Pawar Beed Sabha: शरद पवारांच्या टार्गेटवर अजित पवार गटाचा दुसरा नेता, बीडमध्ये करणार शक्तिप्रदर्शन

Sharad Pawar Latest News: शरद पवार लवकरच राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांच्या बालेकिल्ल्यात येत्या १७ ऑगस्टला शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
Sharad Pawar
Sharad Pawarsaam tv
Published On

नवविनोद जिरे, बीड

Beed News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर दोन गट पडले. त्यामुळे राज्याच्या राजकारणातही मोठा राजकीय भूकंप झाला. अशामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसची विस्कटलेली घडी नव्या जोमाने उभारण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) हे कामाला लागले आहेत.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांची पहिली सभा अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या येवल्यात झाली. त्यानंतर आता शरद पवार यांच्या निशाण्यावर अजित पवार गटाचा दुसरा नेता आहे. शरद पवार लवकरच राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांच्या बालेकिल्ल्यात येत्या १७ ऑगस्टला शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

Sharad Pawar
Nawab Malik News: नवाब मलिक राष्ट्रवादीच्या नेमक्या कोणत्या गटासोबत जाणार?, समोर आली मोठी अपडेट

बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मराठवाड्यातील त्यांची पहिलीच सभा बीडमध्ये होणार असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांनी मोर्चा मराठवाड्यामध्ये वळवत राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळख असलेल्या धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात जोरदार सभेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या टारगेटवर धनंजय मुंडे तर नाहीत ना ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय.

Sharad Pawar
Pune News : राजगडावर फिरायला गेलेल्या भिंवडीतील ३३ वर्षीय पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?

बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या सभेच्या अनुषंगाने जोरदार तयारी देखील केली आहे. स्वत: रोहित पवार बीडमध्ये तळ ठोकून आहेत. तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये सभेच्या अनुषंगाने शरद पवारांनी स्वतःची यंत्रणा लावली आहे. संदीप क्षीरसागर यांच्या कुशल नियोजनाने बीडमधील शरद पवारांच्या सभेला फार मोठा प्रतिसाद मिळणार आहे. पवारसाहेबांचा विचार टिकवायचा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आज इथं 40 - 45 हजार लोकं बसण्याचा मंडप आहे. मात्र ही जागा पुरणार नाही. असा दावा रोहित पवार यांनी करत जिल्हा कुठल्या एका नेत्याचा नसतो असे म्हणत धनंजय मुंडेवर तोफ डागली आहे.

Sharad Pawar
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे लोकसभेच्या सर्व ४८ जागांचा आढावा घेणार, उद्यापासून बैठकांचा धडाका

या सभेच्या माध्यमातून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट केले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना दुसरीकडे मात्र धनंजय मुंडे समर्थक आणि अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी ओबिसीचे प्रदेशअध्यक्ष कल्याण आखाडे यांनी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बीड होता आणि राहील असे सांगितले. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात चार आमदार, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सत्ता टिकून आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे नेतृत्व मजबूत आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, येवल्याच्या सभेला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता शरद पवार यांनी थेट कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात पवारांची तोफ धडकणार आहे. मराठवाड्यातील पहिलीच जाहीर सभा बीडमध्ये होत असल्याने भव्य शक्तिप्रदर्शनची तयारी सुरु आहे. दरम्यान या सभेकडे राज्याचे लक्ष लागले असून बीडमधून शरद पवार काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com