NCP Leader Naresh Shelke
NCP Leader Naresh Shelkesaam tv

Sharad Pawar Faction : सरकारने उद्योगपतींना हाताशी धरुन शेतमालाचे भाव पाडले : नरेश शेळके

शासन शेतकऱ्यांप्रती कोणतीच काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे.
Published on

Buldhana News : केंद्र शासनाने व उद्योगपतींशी संगनमत करून शेतमालाचे भाव पाडले असा आराेप आज (बुुधवार) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) पदाधिका-यांनी बुलढाणा (NCP Buldhana) येथे केला. सरकारने शेतक-यांना तातडीने न्याय द्यावा अन्यथा राज्यभर आंदाेलन छेडू असा इशारा नरेश शेळके (कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी दिला. (Maharashtra News)

NCP Leader Naresh Shelke
Crime News : मुलीच्या धाडसामुळे कुटुंबावरील मोठे संकट टळले, ४ सशस्त्र दरोडेखोरांना अटक

नरेश शेळके म्हणाले नैसर्गिक व सुलतांनी संकटाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. आता केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कापूस, साेयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. शासन शेतक-यांप्रती काेणतीच काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे.

शेळके पुढे म्हणाले राज्यातील खरीप पिक असलेले सोयाबीन व कापूस या पिकाचे भाव केंद्र शासनाने उद्योगपतींशी हात मिळवणी करून पाडले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. या शेत मालाच्या भाव वाढीसाठी तातडीने प्रयत्न करावेत अन्यथा राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देखील शेळकेंनी दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

NCP Leader Naresh Shelke
Sugarcane : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 'या' साखर कारखान्याकडून प्रोत्साहनपर बक्षीस योजना जाहीर

राज्यात ड्रग्ज आणि अन्य बेकायदेशिर व्यवसाय माेठ्या प्रमाणात फाेफावले आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. बुलढाणा जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर निर्बंध लावावेत अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आंदाेलन छेडेल असा इशारा कार्याध्यक्ष नरेश शेळके यांनी दिला आहे. त्याबाबतचे निवेदन शेळकेंनी जिल्हाधिकारी किरण पाटील यांना दिले.

Edited By : Siddharth Latkar

NCP Leader Naresh Shelke
Karnataka Security At Kognoli Toll Plaza : महाराष्ट्रातील मंत्र्यांसह नेत्यांना बेळगावात नाे एंट्री, जिल्हाधिका-यांचा आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com