Eknath Shinde Devendra Fadnavis
Eknath Shinde Devendra Fadnavis Saam TV

'शिंदे साहेबांचे मनापासून आभार, त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना PA म्हणून ठेवलं'

मिटकरींनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांना काढला.

अकोला : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. 'शिंदे साहेबांचे (Ekanath Shinde) मी मनापासून आभार मानतोय त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना 'पीए' म्हणून ठेवलं' असा टोला नाव न घेता मिटकरींनी फडणवीसांना लगावला आहे. (Amol Mitkari Latest News)

Eknath Shinde Devendra Fadnavis
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात घोषणाबाजी; शिवसेना शहरप्रमुखांसह १८ जणांवर गुन्हा

औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशिव असं नामकरण करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. यासोबतचं नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णायानंतर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

यावेळी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार कायद्याने धरून नाही, असं भाजप नेते त्यावेळी म्हणत होते. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत यांनीच 'अनलिगल सरकार' स्थापन केलं. दोन मंत्र्याच्या मंत्रिमंडळात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् त्यांचं 'ओएचडी' म्हणून देवेंद्र फडणवीस काम पाहत आहे. त्यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयाला त्यांनी पुनवृत्ती करण्याचं केलं. (Ekanath Shinde Latest News)

Eknath Shinde Devendra Fadnavis
मनसे आमदार राजू पाटील यांनी शिंदे-फडणवीसांकडे केली 'ही' मागणी

पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, 'सुप्रीम कोर्टाचा निर्णयपर्यंत हे सरकारच टिकणार की नाही हे माहित नाही. राज्याला अजूनही कृषी मंत्री नाही. शिंदे साहेबांचे मी मनापासून आभार मानतोय त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना 'पीए' म्हणून ठेवलं' असा चिमटाही मिटकरींनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांना काढला.

'ठाकरे सरकारच्या काळात उध्दवजी स्वतः माईक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्यायचे. आताचे मुख्यमंत्री हे माईक खेचायला लागले आहेत. पुढे काय काय खेचतील सांगता येत नाही' असा टोला देखील अमोल मिटकरींनी यावेळी लगावला.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com