Sharad Pawar News : शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिला मोठा इशारा; म्हणाले, 'संधी आल्यावर...'

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar Saam TV
Published On

चेतन व्यास

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'संधी आल्यावर यांना जागा दाखवायची आहे. महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत एक जागा भाजपला मिळाली आहे. यामुळे आता भाजपला जागा दाखविण्याचा निर्धार लोकांनी केला आहे. लोकांनी ठरवलं आहे की, महाराष्ट्राचं परिवर्तन घडवू, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

शरद पवार सध्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. वर्ध्यातील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, 'संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सांगितलं की माझ्याशी कोणी संघर्ष करू शकत नाही. देशात शेतीमालाची किंमत वाढली पाहिजे. या देशाच्या काळ्या आईशी इमान राखणाऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे. तरुणांची अवस्था बिकट आहे. नोकरीसाठी वणवण हिंडत आहे'.

Sharad Pawar
Uddhav Thackeray: हिंमत असेल तर निवडणुका घ्या, तयार आहोत; उद्धव ठाकरे यांचे भाजपला आव्हान

'वर्धा जिल्हा हा अनेक दृष्टीने महत्वाचा आहे. या जिल्ह्यातून जगाला शांततेचा संदेश देण्यात आला आहे. वर्धेत अनेक लोक महात्मा गांधी यांचे विचार पाहण्यासाठी येऊ पाहतात. पण राज्यकर्ते लक्ष द्यायला तयार नाहीत, अशी टीका शरद पवार यांनी केली.

'अनिल देशमुख (Anil Deshmukh) प्रकरणात सत्तेचा गैरवापर करून करून बेकसुरावर कारवाई करण्यात आली आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर १३० धाडी टाकण्यात आल्या. त्यांना हेच सांगत होते की, तुम्ही पक्ष, नेतृत्व बदला पण अनिल देशमुख डगमगले नाहीत. यासाठी तुम्हाला सत्ता दिली का, पूर्ण पणे सत्तेचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. संधी आल्यावर यांना जागा दाखवायची आहे, असा इशारा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला.

Sharad Pawar
Amit Shah: अमित शाह पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार नाहीत! विरोधकांच्या आरोपांना भाजपचं उत्तर

'महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत एक जागा भाजपला मिळाली. यामुळे आता भाजपला जागा दाखविण्याचा निर्धार लोकांनी केला आहे. लोकांनी ठरवलं आहे की, महाराष्ट्राचं परिवर्तन घडवू, असे शरद पवार पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com