Sharad Pawar News : सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही; शरद पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar Speech : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Sharad pawar
Sharad pawar saam tv
Published On

Sharad Pawar News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच वीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. माफी मागायला मी सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे, गांधी कुणाचाही माफी मागत नाही, असं राहुल गांधी म्हणाले. त्यांच्या या विधानावरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली. दरम्यान, या वादावर शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

Sharad pawar
Narendra Modi News : काहींनी मोदींच्या बदनामीची सुपारीच घेतलीय; खुद्द पंतप्रधानांनीच सांगितला 'डाव'

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज नागपुरात (Nagpur) आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर भाष्य करत विरोधकांची चांगलीच हवा काढली. सावरकर यांनी दिलेलं योगदान विसरता येणार नाही. पण सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही, असं शरद पवार म्हणाले.

पुढे बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले,सावरकर यांनी अनेक वक्तव्य केली आहेत. त्यात सामाजिक आणि वैज्ञानिक हे दोन्हीही अँगल असायचे. सावरकर यांनी मंदिरात पूजेसाठी वाल्मिकी समाजाचा व्यक्त ठेवला. हे प्रोग्रेसीव्ह आहे. ते गाय उपयुक्त पशू आहे, असं देखील बोलले. गाय उपयुक्त असेल तर अन्य कामासाठी द्यावी, असा सावरकरांचा विचार होता, असं देखील शरद पवारांनी ठामपणे सांगितलं.

Sharad pawar
Shraddha Walkar Case : श्रद्धाचा मारेकरी आफताब पूनावालाला जेलमध्ये मारहाण; कैदी एकत्र जमले अन्...

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या विधानावर शरद पवार म्हणाले, "प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. परदेशात जाऊन या देशाबद्दल काही टीका टिप्पण आजंच केली जाते असं नाही. यापूर्वी देखील अनेकांनी केली आहे", असं म्हणत त्यांनी अप्रत्यरित्या राहुल गांधी यांची पाठराखण देखील केली.

भाजपवर साधला निशाणा

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने मिशन ४०० चा नारा दिला आहे. यावर बोलताना पवारांनी परखड शब्दात टीका केली. आम्ही मिशन ४००, ४४५ ऐकत असतो. राजकीय पक्ष म्हणून निवडणूकीला सामोरं जाण्याची तयारी करत असते. पण आम्ही असं कुठलंही भाष्य करत नाही. याची माझ्या गावापासून सुरुवात होते. याचा मला आनंद होतो, असं म्हणून पवारांनी मिशन ४०० चा नारा देणाऱ्या भाजप नेत्यांना टोला हाणला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com