वाढती गुन्हेगारी आणि अमली पदार्थाचे वाढते प्रमाण यावर आळा घालण्यासाठी कोम्बिंग ऑपेरेशन सुरू करण्यात आले आहे. मात्र, यावेळी कोयता लपवत एक बाईकस्वार संशयितरित्या उभा असलेला आढळला. पोलीस वाहन पाहताच संशयिताने पळ काढला मात्र कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी जीवाची बाजी लावत फिल्मी स्टाईलने आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
यावेळी संशयिता सोबत झालेल्या झटापटीत औदुंबर पाटील यांना दुखापत झाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा सिसीटीव्ही समोर आला असून नवी मुंबई पोलीसांचे कौतुक करण्यात येत आहे.
कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी आणि अमली पदार्थाचे वाढते प्रमाण यावर आळा घालण्यासाठी कोम्बिंग ऑपेरेशन करण्यात आलेय. 25 अधिकारी आणि 140 अंमलदार यांची 14 तुकड्यामध्ये विभागणी करुन हे कोम्बिंग ऑपेरेशन करण्यात आले. या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान 27 समन्स आणि दोन बेलेबल वॉरंट बजावण्यात आले आहेत.
इराणमध्ये जहाजावर नोकरीसाठी गेलेले नाशिकमधील दोन तरुण कुवेतच्या किनाऱ्यावर बुडालेल्या जहाजातून सुदैवाने बचावले होते. मात्र त्यांच्याकडील पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे हरवल्यामुळे तेथील तरुंगात ते अडकून पडले होते. नवी मुंबईतील ऑल इंडिया सीफेरर्स युनीयनने केलेल्या पाठपुराव्यामुळे या दोन तरुणांची सुटका झाली आहे. नुकताच हे दोन्ही तरुण मुंबईत सुरखरुप परतले आहेत.
अविष्कार जगताप व निवृत्ती बागूल अशी सुटका झालेल्या तरुणांची नावे असून हे दोघेही नाशिक येथे राहणारे आहेत. या दोघांना डिसेंबर 2023 मध्ये एक एजंटने इराण देशात नोकरीसाठी पाठवले होते. इरामधील जहाजावर काम करत असताना 19 जानेवारी रोजी कुवेतच्या समुद्र किनाऱ्यावर जहाज बुडाले होते. त्यावेळी जहाजावरील सर्वजण बुडाले मात्र अविष्कार आणि निवृत्ती हे दोघे बोटीतून सुखरुप किनाऱ्यावर पोहोचले होते. त्यानंतर कुवेतमधील पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र जहाज बुडाल्यामुळे अविष्कार व निवृत्ती या दोघांचे पासपोर्ट व इतर कागदपत्रे हरविल्याने त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.