सिद्धेश म्हात्रे
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात मनसेला मोठा झटका बसला आहे. मनसे नवी मुंबई उपशहर अध्यक्षांसह ५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे मनसेत खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
नवी मुंबईत मनसेला (MNS) मोठा धक्का बसला आहे. नवी मुंबईत मनसेच्या उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे यांच्यासह 5 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. मनसे प्रवक्ते तथा शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या आर्थिक हितसंबंधांमुळे काम करण्यास अडचणी येत असल्याने राजीनामा दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
गजानन काळे यांचे महापालिकेत आर्थिक हितसंबंध असल्याने अधिकारी आमच्या पत्रांना उत्तर देत नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. वरिष्ठांना वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने पक्षात नाराजी असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवी मुंबईत (Navi Mumbai( मनसेत पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. नवी मुंबईत नेतृत्वबद्दल करण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी होत आहे. प्रसाद घोरपडे म्हणाले की, 'गेल्या काही दिवसांपासून मी पदावर असल्यापासून मला अंतर्गत बाबींमध्ये त्रास द्यायचा प्रयत्न सुरू होता. मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबत सांगितले. त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे मनसेच्या नवी मुंबई उपशहर अध्यक्षपदाचा राजीनामा वरिष्ठ नेत्यांकडे सोपावला आहे'.
'गजानन काळे हे माझ्या विरोधात बैठक लावत होते. मी तीन-चार घरी होतो, त्यावेळी कोणत्याही प्रकारची विचारपूस करण्यात आली नाही. मला गजानन काळे यांनी कार्यालयात येऊन धमकी दिली होती, असेही घोरपडे म्हणाले. घोरपडे यांच्या आरोपानंतर गजानन काळे काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.