Rohit Pawar :शरद पवारांवर बोलण्यापेक्षा दुधाच्या दराकडे लक्ष द्यावं; रोहित पवारांचा विखे-पाटलांना टोला

Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांनी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर दुधाच्या दरावरून टोला मारलाय.
Rohit Pawar
Rohit Pawar Saam Tv
Published On

(सुशील थोरात)

Rohit Pawar Comment on Radhakrishna Vikhe Patil:

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शरद पवारांना आपली जात सांगून 'एक मराठा लाख मराठा' अशी घोषणा द्यावी, असे आवाहन केले होतं. याला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. (Latest News)

कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले असून महसूल मंत्री आणि दुग्ध आणि पशूसंवर्धन मंत्री म्हणून ज्या खात्याचा कारभार राधाकृष्ण विखे-पाटील हे पाहत आहेत. त्याअंतर्गत येणाऱ्या दुधाचे भाव सध्या गडगडले आहेत. दुधाचे भाव कसे वाढावेत, यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. तसेच लोकसभा निवडणूक जवळ आली असल्यामुळे प्रत्येक जण जातीपातीचे राजकारण करत असल्याचेही रोहित पवारांनी यावेळी सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज ठाकरेंच्या टीकेला रोहित पवारांचे उत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जातीवादी पक्ष असल्याची टीका केली होती. आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले असून लोकसभा निवडणूक जवळ आली असल्यामुळे अनेक लोक सध्या जातीपातीच्या राजकारणात बोलू लागले आहेत. मात्र यापेक्षा जनतेच्या प्रश्नावर लक्ष देणे गरजेचे आहे. जातीपातीच्या प्रश्नावर दुर्लक्ष करणे गरजेचे असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.

काय म्हणाले होते विखे-पाटील

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या जातीचा उल्लेख असलेले काही कागदपत्रे व्हायरल झाले होते. त्यावरून उलटसुलट चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. यावर बोलताना शरद पवार यांनी सगळ्या देशाला माझ्या जातीबाबत माहीत असल्याचं सांगितलं होतं. त्यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यावर टीका केली होती. शरद पवार म्हणतात की, मी कधीच जातीचे राजकारण केलं नाही. या गोष्टीवर आम्हाला आक्षेप असून त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी विखे पाटलांनी केली होती.

Rohit Pawar
Sharad Pawar News: मंत्री अनिल पाटील पुन्हा निवडून आलेले दिसणार नाहीत; शरद पवारांचा खळबळजनक दावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com