NCP Maharashtra News : सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द; निवडणूक आयोगाचा निर्णय

राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द; निवडणूक आयोगाचा निर्णय
Sharad Pawar NCP News
Sharad Pawar NCP NewsSaam tv news
Published On

Maharashtra Political Breaking news: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा (Ncp National Party Status) दर्जा रद्द करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

यातच सर्वात महत्वाचं म्हणजे तृणमूल आणि आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party - AAP) यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. आपचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. मात्र आता राष्ट्रवादी पक्षाचा हा दर्जा गेला आहे.

Sharad Pawar NCP News
Intresting Fact About ATM PIN: एटीएम पिन फक्त चार अंकी का असतो? जाणून घ्या यामागचं कारण

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती की, राष्ट्रवादी काँग्रेसच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला जाणार आहे. एकाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा जो दर्जा मिळतो त्या निकषात राष्ट्रवादी पक्ष बसत नव्हता. मात्र दुसरीकडे आम आदमी पक्ष या निकषावर पात्र ठरत होता. (Latest Marathi News)

Ncp Lose National Party Status : दिल्लीतील कार्यलय करावं लागेल रिकामं

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिल्लीत (Delhi) देण्यात आलेलं कार्यलय देखील रिकामं करावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. कारण महाराष्ट्रातील भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त हा एकमेव पक्ष होता, ज्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा होता. जो आता काढण्यात आला आहे.

Sharad Pawar NCP News
Judgment of Divorce: पतीला आई-वडिलांपासून दूर राहण्यास भाग पाडणे ही पत्नीची क्रूरता, उच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी

When Does a National Party Get Status in India : राष्ट्रीय पक्षाचा दर्जा केव्हा मिळतो?

एखाद्या पक्षाने 4 वेगवेगळ्या राज्यांतील लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मते आणि लोकसभेत किमान 4 जागा मिळवल्या पाहिजेत. कोणत्याही पक्षाला किमान चार किंवा अधिक राज्यांमध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळायला हवी. हे निकष पूर्ण केल्यानंतरच एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com