Intresting Fact About ATM PIN: एटीएम पिन फक्त चार अंकी का असतो? जाणून घ्या यामागचं कारण

ATM PIN: एटीएम पिन फक्त चार अंकी का असतो? जाणून घ्या
ATM Card
ATM CardSaam Tv
Published On

Utility News in Marathi: पूर्वी कॅश काढण्यासाठी लोकांना बँकांमध्ये लांबच लांब रांगा लावून तासनतास ताटकळत उभे राहावे लागत होते. मात्र नंतर एटीएमची सुविधा सुरू झाल्याने बँकांमध्ये फिरण्याचा त्रास संपला.

आता पैसे काढण्यासाठी लोक फक्त त्यांचे एटीएम कार्ड घेऊन जवळच्या एटीएम मशीन केबिनमध्ये जातात आणि 4 पिन कोड टाकून पैसे काढतात. यातच एटीएम पिनमध्ये फक्त चारच क्रमांक का असतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत...

ATM Card
Judgment of Divorce: पतीला आई-वडिलांपासून दूर राहण्यास भाग पाडणे ही पत्नीची क्रूरता, उच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी

आधी 6 अंकी होता एटीएम कोड

आता जरी आपण एटीएम मशिनमधून 4 नंबरची पिन टाकून पैसे काढतो, मात्र सुरुवातीला 6 नंबर एटीएम कोड होता. कारण सुरक्षेच्या दृष्टीने 4 पेक्षा 6 नंबरची पिन चंगळ होता, असं मानलं जात होतं. मात्र लोकांची होणारी गैरसोय आणि अनेकवेळा पिन विसरण्याची समस्या, यामुळे एटीएम पिन 4 नंबरी ठेवण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. (Latest Marathi News)

असं असलं तरी आता 6 नंबरी पिन कुठेही वापरला जात नाही असे नाही. जगात असे अनेक देश आहेत, जिथे 6 नंबरचा एटीएम पिन आहे. 4 ऐवजी 6 पिन ठेवल्यास इतर कोणत्याही व्यक्तीला एखाद्याची पिन पटकन लक्षात ठेवणे सोपे होतं नाही. यामुळे पिन हॅक होण्याची शक्यता कमी होते.

ATM Card
Stock Market Latest Updates: फक्त 5 दिवसात 20 टक्क्यांनी वाढला टाटा समूहाचा 'हा' शेअर, 3 वर्षांत सुमारे दिला 3015% परतावा

भारतात लागला ATM चा शोधक (Inventor of ATM in India)

दरम्यान, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ज्या व्यक्तीने ATM चा शोध लावला त्याचा जन्म भारतात झाला होता. एटीएम मशीनचा शोध 1969 मध्ये लागला. जॉन एड्रियन शेफर्ड बॅरॉन या स्कॉटिश शास्त्रज्ञाने एटीएम मशीनचा शोध लावला.

पण त्यांचा जन्म भारताच्या ईशान्येला असलेल्या शिलाँग शहरात झाला. जॉन एड्रियन शेफर्ड बॅरॉनच्या शोधामुळे लोकांची आज एका मोठ्या समस्यांपासून सुटका झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com