

Nashik News: राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. अशामध्ये कोल्हापूरमध्ये (Kolhapur) सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट (post offensive) केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या पोस्टनंतर बुधवारी कोल्हापूरात करण्यात आलेल्या आंदोलनावेळी दगडफेक करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता नाशिक पोलीस अलर्ट मोडवर आली आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना आता नाशिक पोलिसांनी (Nashik Police) चांगलीच तंबी दिली आहे.
सोशल मीडियावर (Social Media) आक्षेपार्ह पोस्ट केल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा नाशिक पोलिसांनी दिला आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस अलर्ट झाले आहेत. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट वायरल करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर जातीयतेढ निर्माण होईल असे पोस्टर आणि लिखाण करु नका, असे आवाहन नाशिक पोलिसांनी यावेळी केले आहे.
कुठल्याही समाजविघातक कृत्यात सहभागी होऊ नका. अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देत नाशिकच्या सायबर पोलिसांनी सोशल मीडियाद्वारे तरुणांना आवाहन केलं आहे. तर सोशल मीडियावर नाशिक पोलिसांची करडी नजर राहणार आहे. असे कृत्य जर कोणी केले तर त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा नाशिक पोलिसांकडून देण्यात आला आहे.
नाशिक पोलिसांनी सोशल मीडिया पेट्रोलिंग ही व्यवस्था चालू केली आहे. पोलिसांनी नाशिककरांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. तसंच, कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यासोबतच सामाजिक पोस्ट, फोटो, मजकूर व्हायरल करणाऱ्यांविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अन्वये कायदेशीर कारवाईचा इशारा नाशिक पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करण्यापूर्वी नाशिककरांनी विचार करावा नाही तर कारवाईला सामोरे जावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.