>>सचिन गाड, साम टीव्ही
Mumbai Hostel Student Murder Case : सवित्रिदेवी फुले वसतिगृहातील विद्यार्थिनीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी ओमप्रकाश कनोजियाने हत्येच्या तीन दिवस आधी देखील मुलीच्या खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला होता असा खुलासा पीडीतेच्या मैत्रिणीने पोलीस चौकशीत केला आहे.
पीडितेच्या मैत्रिणीने सांगितले की घटनेच्या तीन दिवस आधी देखील आरोपीने मुलीच्या खोलीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. सकाळी 5 वाजता जोरात दरवाजा वाजवून त्याने मुलीची झोप मोड केली होती. तसेच मुलीच्या खोलीत शिरण्याचा देखील त्याचा प्रयत्न होता. परंतु पीडित मुलीने त्याला खडसावलं होतं. घडलेला हा प्रकार तिने आपल्याला सांगितला होता अशी माहिती पीडीतेच्या मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात दिली आहे.
पीडितेच्या 53 वर्षीय वडिलांनी देखील सांगितले की मुलीने त्यांना याबाबत कल्पना दिली होती. त्यानंतर त्यांनी तिला हॉस्टेल वॉर्डनला कळवण्याचा सल्ला दिला होता. मात्र आपल्याला कोणीही कळवले नसल्याचे वॉर्डनने पोलिसांना सांगितले आहे. विशेष म्हणजे होस्टेलमध्ये तीन सुरक्षा रक्षक होते आणि तिन्ही पुरुष होते. यावरून मुलीच्या वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक का नाहीत? असा सवाल पीडितेच्या वडिलांनी केला आहे. (Mumbai Hostel Student Murder Case)
तसेच वसतिगृह प्राधिकरणाच्या संबंधातील निष्काळजीपणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. पीडित मुलीने वॉर्डनला वसतिगृहातील बरीच जागा रिकामी असल्याने तिला खालच्या मजल्यावर हलवण्यास सांगितले होते. परंतु तिला एकतर तिच्या चौथ्या मजल्यावरील खोलीत राहण्यास किंवा वसतिगृह सोडण्यास सांगण्यात आले, असा दावा देखील पीडितेच्या वडिलांनी केला आहे. (Crime News)
अकोला जिल्ह्यातून आलेली पीडित मुलगी वांद्रे येथील कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात होती आणि एप्रिल 2021 पासून वसतिगृहात राहात होती. तिला एक जुळा भाऊ आहे. आरोपी 35 वर्षीय कनोजिया मंगळवारी पहाटे 4.44 वाजता वसतिगृहातून बाहेर पडताना दिसला होता, त्यानतंर त्याने रेल्वे रुळांवर जाऊन आत्महत्या केली. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.