Sambhajinagar: रात्री ११ नंतर छत्रपती संभाजीनगर शहर होणार बंद; नेमके कारण काय?

रात्री ११ नंतर शहर होणार बंद; पोलीस आयुक्तांचा निर्णय, हॉटेल व्यावसायिकांची मात्र नाराजी
Sambhajinagar
SambhajinagarSaam tv

नवनीत तापडीया

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन रात्री ११ वाजेनंतर (Sambhajinagar) शहर बंद करण्याचा निर्णय पोलिस (Police) आयुक्त मनोज लोहिया यांनी घेतला आहे. त्यासाठी गुन्हेशाखा कामाला लागली आहे. (Tajya Batmya)

Sambhajinagar
Saam Impact News: पाण्यासाठीची पायपीट आता थांबणार; लंडनच्या संस्थेकडून आदिवासी महिलांना १०६ वॉटर ड्रम वाटप

छत्रपती संभाजीनगर शहरात मागील दोन आठवड्यांपासून चाकू हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. किरकोळ भांडण झाले तरी लोक थेट चाकूने भोसकू लागले आहेत. घरात, रस्त्यावर, गल्लीत कोठेही या घटना घडत आहेत. त्यामुळे नियमानुसार रात्री ११ वाजेनंतर शहर बंद झाले पाहिजे; अशी भूमिका पोलिस आयुक्त लोहिया यांनी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी प्लॅन तयार केला आहे. सुरुवातीला सर्व ठाणेदारांना आपल्या हद्दीत ११ वाजेनंतर आस्थापना उघड्या राहणार नाहीत. याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. रात्री साडेदहा वाजेनंतर सहा पथके एकाच वेळी रस्त्यावर उतरतायत. ती वेगवेगळ्या भागांत जाऊन आस्थापना बंद करण्याचे कालपासून आवाहन सुरू केले आहे.

Sambhajinagar
Child Marriage: धक्कादायक..एकाच मुलीचा तीन वेळा बालविवाह; चाईल्ड लाईनने आणली धक्कादायक माहिती समोर

हॉटेल व्‍यावसायिकांचा विरोध

आवाहनाला प्रतिसाद देऊन जे बंद करतील त्यांचे स्वागत केले जाते. मात्र, जिथे विरोध होईल तेथे कायद्याचा बडगा उगारला जात आहे. तर दुसरीकडे या निर्णयावरून हॉटेल्स व्यावसायिकांनी नाराजी दर्शवली आहे. तसेच हॉटेल्स व बार सुरू करण्यासाठी राज्य शासनाने रात्री दीड वाजेपर्यंतची मुदत दिली असल्याचे परिपत्रक देखील यावेळी हॉटेल व्यवसायिकांकडून दाखवण्यात आले. अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा असल्यास आमच्याशी चर्चा करून निर्णय घ्यायला हवा, अशी अपेक्षा हॉटेल व्यवसायिकांनी व्यक्त केली. तर या संदर्भात आम्ही पोलीस आयुक्तांना भेटून त्यांना निवेदनही देणार असल्याचे हॉटेल्स व्यावसायिकांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com