Nashik Vineyard: द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांपुढे नवं आव्हान, द्राक्षबागांवर थंडीसोबत वटवाघळांचंही संकट

द्राक्ष बागा काढणीच्या अवस्थेत आलेल्या असतांना कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षांची घडकुज होण्याची भीती आहे
Nashik Vineyard
Nashik VineyardSaam Tv
Published On

नाशिक : अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल यामुळे आधीचं संकटात सापडलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता वटवाघळांच्या रूपानं नवं संकट उभं ठाकलंय. द्राक्ष बागा काढणीच्या अवस्थेत आलेल्या असतांना कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षांची घडकुज होण्याची भीती आहे (Nashik Vineyard Farmers Had To Protest Farm From Cold And Bats).

Nashik Vineyard
आता द्राक्ष उत्पादक ठरवणार द्राक्षाचे दर

त्यामुळे नाशिकच्या (Nashik) शेतकऱ्यांना थंडीत कुडकुडत बागांमध्ये शेकोट्या पेटवून ऊबदार वातावरण निर्माण करावं लागतंय. या माध्यमातून द्राक्ष बागा (Vineyard) वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु असतांनाचं पिंपळगावमधील शेतकऱ्यांना मात्र थंडीसोबतचं द्राक्ष बागांवर वटवाघळांच्या (Bat) हल्ल्याचा सामना करावा लागतोय.

Nashik Vineyard
द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना पॅकेज द्या : राजू शेट्टी

रात्रीच्या वेळी वटवाघळं या भागातील द्राक्ष (Grapes) बागेतल्या काळ्या द्राक्षांना लटकून द्राक्ष खातात, द्राक्षाचे घड खाली पाडून देत असल्यानं द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. वटवाघळांच्या उपद्रवामुळे द्राक्ष उत्पादनालाही याचा फटका बसत असल्यानं सध्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या (Farmers) अडचणीत भर पडलीये.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com