आता द्राक्ष उत्पादक ठरवणार द्राक्षाचे दर

1 जानेवारीपासून द्राक्षाचे दर निश्चित करणार
आता द्राक्ष उत्पादक ठरवणार द्राक्षाचे दर
आता द्राक्ष उत्पादक ठरवणार द्राक्षाचे दरSaam Tv
Published On

नाशिक - येत्या 1 जानेवारीपासून द्राक्षाचे दर निश्चित करण्याचा निर्णय राज्य द्राक्ष बागायतदार संघाने घेतला आहे. त्यामुळे आता द्राक्ष बागायतदार संघ ठरवेल त्याचं दराने द्राक्षाची निर्यात आणि विक्री होणार आहे. हा दर ठरवतांना उत्पादन खर्च वसूल होऊन उत्पादकाला चार पैसे शिल्लक राहतील, असा दर निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस आणि कोरोना संकटामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं आहे.

हे देखील पहा -

तर मागील 5 वर्षांत उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली असून उत्पादन खर्चाचा विचार करून दराबाबत निर्णय घेतला जाणार आहे. यामध्ये निर्यातीचा दर वेगळा आणि देशांतर्गत बाजारपेठेसाठी वेगळा दर निश्चित केला जाणार आहे. विशेष म्हणजे दर आठवड्याला द्राक्षांची गुणवत्ता, मागणी आणि पुरवठ्याचा विचार करून द्राक्षाचे दर ठरवले जातील.

आता द्राक्ष उत्पादक ठरवणार द्राक्षाचे दर
मराठी भाषिकांवरील हल्ले थांबवावेत : महापौर दिग्विजय सूर्यवंशी

1 जानेवारीपासून 2022 पासून याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती द्राक्ष बागायतदार संघाने दिली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. सोबतचं निर्यातीच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा जीएसटी टॅक्स परतावा अतिशय कमी असून सरकारनं 9 रुपये 50 पैसे परतावा देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com