Nashik : धक्कादायक! प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ मनीषा जेजूरकर यांची आत्महत्या, डॉक्टर नवरा घरात नसताना टोकाचे पाऊल

why Dr Manisha Jejurkar died in Nashik, : नाशिकमधील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ डॉ. मनीषा जेजूरकर यांनी गंगापूर रोडवरील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Dr Manisha Jejurkar died
Dr Manisha Jejurkar diedSaam TV Marathi
Published On

अभिजित सोनवणे, नाशिक प्रतिनिधी

Nashik Ayurvedic doctor Dr Manisha Jejurkar suicide case : नाशिकमधील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ डॉ. मनीषा जेजूरकर यांनी टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील मनोविकारतज्ज्ञ डॉ. नीलेश जेजुरकर यांच्या मनीषा पत्नी होत्या. मनीषा जेजुरकर यांनी गंगापूर रोडवरील राहत्या घरात नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मनीषा यांनी आत्महत्या का केलं? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू केली जात आहे. मनीषा यांचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठवला असून जवळच्या नातेवाईंकांकडे चौकशी केली जात आहे. पोलिसांकडून या आत्महत्येमागील कारणाचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Dr Manisha Jejurkar died
Pune : बुधवार पेठेत पोलिसांची पुन्हा अचानक छापेमारी, ४ महिलांची सुटका, भोपसिंगला ठोकल्या बेड्या

जेजूरकर दाम्पत्य हे वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित नाव आहे. डॉ. मनीषा या नाशिकमधील नामवंत आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून परिचित होत्या. त्यांचे पती डॉ. नीलेश जेजूरकर हे जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉ. मनीषा यांनी इतक्या टोकाचा निर्णय का घेतला, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी कोणतीही 'सुसाईड नोट' सापडल्याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. गंगापूर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, घरातील सदस्य आणि परिचितांचे जबाब नोंदवले जाण्याची शक्यता आहे.

Dr Manisha Jejurkar died
LPG shortage : देशात गॅस टंचाई टाळण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल, आणीबाणीच्या तरतुदी लागू

महत्त्वाची टीप: आयुष्यात अनेकदा कठीण प्रसंग येतात. पण आत्महत्या हा त्यावरचा उपाय नाही. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणालाही मानसिक तणाव जाणवत असेल, तर कृपया मानसोपचार तज्ज्ञ किंवा हेल्पलाईन क्रमांकांशी संपर्क साधावा.

Dr Manisha Jejurkar died
Gas Cylinders : दरवाढीचा भडका उडाला! घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ, वाचा ताजे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com