

अजय सोनवणे, नाशिक
नाशिकमधील मनमाड-येवला राज्यमार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या राज्यमार्गावर कंटेनर आणि कारची समोरासमोर धडक झाली. अंकाई रेल्वे उड्डाणपुलावर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत. या अपघातानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या मनमाड-येवला राज्यमार्गावरील भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. कंटेनर आणि कारची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अंकाई रेल्वे उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातातील सर्व जण नाशिकमधील तरुण होते. रेल्वे उड्डाणपुलावर अपघात झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भरधाव वेगात असलेल्या कारने कंटनेरलला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कारच्या धडकेत कारचा चुराडा झाला. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी अपघातग्रस्तांना कारमधून बाहेर काढले. मात्र, या भीषण अपघातात ५ तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या अपघातात रोहित धनवटे, श्रेयस धनवटे ,ललित सोनवणे, गणेश सोनवणे, प्रतीक नाईक असे अपघातात ठार झालेल्या तरुणांचे नावे आहेत. या अपघातात पाचही तरुण नाशिकचे रहिवाशी आहे. त्यांनी मनमाडजवळच्या कुंदलगाव येथील म्हसोबा देवस्थान येथे धार्मिक कार्यक्रम उपस्थिती लावली.
त्यानंतर येवलामार्गे नाशिककडे परतत असताना भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मृतांचे शव मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. अवकाळी व पाऊस व रात्रीच्या अंधारामुळे मदतकार्य राबविण्यास अडथळा येत होता. रस्त्याच्या मधोमध हा अपघात झाल्याने या मार्गावरची वाहतूक संथ गतीने सुरू होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.