Maharashatra Election: निवडणूक तोंडावर,ठाकरेंचा शिलेदार तडीपार; सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस

Sudhakar Badgujar : आज सकाळीच नाशिक पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस काढल्याने राजकीय विरोधातून ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. दरम्यान तडीपारीच्या नोटीसवरून रंगलेल्या राजकीय वादाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून.
Sudhakar Badgujar
Sudhakar Badgujar Saam Tv

अभिजीत सोनवणे/प्रवीण देवळेकर

नाशिक:

ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आलीये. बडगुजर ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख आहेत. काल शिंदेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आपल्या भाषणात बडगुजर यांचं नाव न घेता सलीम कुत्तावर मुख्यमंत्र्यांचं लक्ष असल्याचं म्हटलं होत.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही भाषणात भुसेंच्या वक्तव्याला दुजोरा दिला होता. त्यानंतर आज सकाळीच नाशिक पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस काढल्याने राजकीय विरोधातून ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. दरम्यान तडीपारीच्या नोटीसवरून रंगलेल्या राजकीय वादाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस आल्यामुळे ठाकरे गटाची अडचण वाढलीय. ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या निवडणूक प्रचाराची धुरा बडगुजर यांच्या हाती आहे. अशात तडीपारीची नोटीस आल्यामुळे संजय राऊतांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. 4 जूननंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तडीपार होणार असल्याची टीका राऊतांनी केलीय. तर शिंदे गटाकडून राऊतांच्याच अटकेचे संकेत देण्यात आलेत.

काही दिवसांपूर्वीच दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टीचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली होती. यानंतर सुधाकर बडगुजर यांच्यामागे चौकशीचा फेरा सुरु झाला.सलीम कुत्तासोबत पार्टीप्रकरणी सुधाकर बडगुजर यांची एसआयटी चौकशी सुरु आहे. तर बनावट कागदपत्रे सादर करून महापालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल आहे.

नाशिकच्या मैदानात शिंदे गटाचे हेमंत गोडसे विरुद्ध ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्यात लढत आहे. हेमंत गोडसेंच्या नावाची उशीराने घोषणा झाल्यामुळे राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात बरीच आघाडी मिळवली होती. मात्र आता प्रचाराची सूत्र हातात असलेले सुधाकर बडगुजर तडीपार झाल्यामुळे गोडसेंचं कमबॅक होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Sudhakar Badgujar
Sanjay Raut: ब्रेंकिंग! PM मोदींबाबत वादग्रस्त विधान, संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल; भाजप नेत्यांकडून अटकेची मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com