Nashik News: धक्कादायक! जन्माला आला मुलगा पण हातात दिली मुलगी, ४ डॉक्टरांसह ८ जणांविरोधात कारवाई
Nashik District HospitalSaam Tv

Nashik News: धक्कादायक! जन्माला आला मुलगा पण हातात दिली मुलगी, ४ डॉक्टरांसह ८ जणांचे निलंबन

Nashik District Hospital: नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये धक्कादायक घटना घडली होती. जन्माला आलेल्या मुलाच्या ऐवजी मुलगी पालकांच्या हातामध्ये दिली. याप्रकरणी ८ जणांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Published on

तरबेज शेख, नाशिक

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये धक्कादायक प्रकार घडला होता. एका महिलेने मुलाला जन्माला घातले. पण डिस्चार्ज देताना या महिलेच्या हातामध्ये मुलगी देण्यात आली. आता या घटनेप्रकरणी कारवाईला सुरूवात झाली आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयातील ८ जणांचे निलंबन करण्यात आले आहे. ४ मुख्य डॉक्टर, ३ शिकाऊ डॉक्टर आणि एक परिचारिका यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

नाशिक जिल्हा रुग्णालयात जन्मलेला अपत्य मुलगा की मुलगी यावरून वाद झाला होता . जन्माला मुलगा आला आणि डिस्चार्ज देताना मुलगी दिल्याचा कुटुंबीयांनी केला आरोप केला होता. सर्व कागदपत्रे नोंदी देखील मुलाच्याच नावाने करण्यात आल्या होत्या. या सगळ्या प्रकारानंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. समितीकडून प्राप्त अहवालानुसार आठ जण दोषी आढळले आहेत. यासर्वांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नातेवाईकांचे समाधान न झाल्यास नवजात बालकाची डीएनए तपासणी होणार आहे.

Nashik News: धक्कादायक! जन्माला आला मुलगा पण हातात दिली मुलगी, ४ डॉक्टरांसह ८ जणांविरोधात कारवाई
Nashik News: अजब-गजब प्रकरण! जन्माला आला मुलगा पण हातात दिली मुलगी; नाशिक जिल्हा रुग्णालयात काय घडलं?

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात एक महिला प्रसुतीसाठी आली होती. या महिलेने मुलाला जन्म दिला. मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज देताना त्यांना मुलगी झाल्याचे सांगण्यात आले आणि बाळही हातात दिले. या प्रकाराने नातेवाईकांनाही धक्का बसला. जिल्हा रुग्णालयाच्या रजिस्टरवर देखील मुलगा झाल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र रुग्णालयाने त्यांना मुलगी झाल्याचे सांगताच नातेवाईकांना धक्का बसला.

रुग्णालय प्रशासनाच्या या कारभारानंतर नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये रात्री उशिरापर्यंत चांगलाच गोंधळ घातला. तसेच बाळाला ताब्यात घेण्यासही नकार दिला. यावेळी पीडित महिलेच्या कुटुंबियांकडून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्यात आला. नाशिक जिल्हा रुग्णालयातील या धक्कादायक घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

Nashik News: धक्कादायक! जन्माला आला मुलगा पण हातात दिली मुलगी, ४ डॉक्टरांसह ८ जणांविरोधात कारवाई
Nashik News: तिकीटासाठी मुलाचे वय विचारल्यामुळे संतापला, कंडक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण; धक्कादायक CCTV

जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेल्या अहवालात आणि सीसीटीव्हीच्या आधारे केलेल्या तपासणीमध्ये असं स्पष्ट झालं आहे की बाळांची कुठल्याही प्रकारची अदलाबदल झाली नसून कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला आहे. या सीसीटीव्हीमध्ये देखील प्रसूतीच्या वेळी जे नातेवाईक सोबत होते तेच बाळ घेऊन बाहेर पडल्याचे दिसून येतं आहे. यामुळे जन्माला येणारे बाळ हे मुलगीच असून बाळाच्या जन्मपूर्वी काढण्यात आलेल्या सोनोग्राफीमध्ये ज्या बाळाला आजार दाखवण्यात आला होता तोच आजार या मुलीला देखील असल्याचं निष्पन्न झाले आहे.

या मुलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिचं काल ऑपरेशन देखील पार पडले. या ऑपरेशनमध्ये देखील तिला आईच्या गर्भात असलेला आजारच असल्याचं निष्पन्न झालंय. यामुळे नातेवाईकांनी देखील याबाबत समाधान व्यक्त केला असल्याचं जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक चारुदत्त शिंदे यांनी सांगितले. मात्र यात ज्या कर्मचाऱ्यांनी फिमेल ऐवजी मेल असं लिहून पुढे रिपोर्ट तयार केले अशा हलगर्जीपणामुळे हा गोंधळ निर्माण झाला त्या सर्वांवर कठोर कारवाई करत निलंबन केलं. यात अजून देखील दोषी आढळल्यास त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे देखील त्यांनी सांगितलं.

Nashik News: धक्कादायक! जन्माला आला मुलगा पण हातात दिली मुलगी, ४ डॉक्टरांसह ८ जणांविरोधात कारवाई
Nashik Breaking News : नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये तोफगोळ्याचा भीषण स्फोट; दोन अग्निवीरांचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com