Supriya Sule on Ajit Pawar : अजितदादांना आज राखी बांधणार का?सुप्रिया सुळेंनी दिलं एका वाक्यात उत्तर

Supriya Sule on Ajit Pawar Rakshabandhan : आज रक्षाबंधनाचा सण असल्याने सुप्रिया सुळे अजित पवार यांना राखी बांधणार का? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.
Supriya Sule on Ajit Pawar Rakshabandhan
Supriya Sule on Ajit Pawar RakshabandhanSaam TV
Published On

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतरही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्र दिवाळी साजरी केल्याचं बघायला मिळालं होतं. मात्र, त्यानंतर लोकसभा निवडणुकीत बहीण भावाच्या नात्यात दुरावा आला. आज रक्षाबंधनाचा सण असल्याने सुप्रिया सुळे अजित पवार यांना राखी बांधणार का? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

Supriya Sule on Ajit Pawar Rakshabandhan
Vidhan Sabha Election : मोठी बातमी! अजित पवार गट जम्मू-काश्मीरची निवडणूक लढवणार; 10 ते 15 उमेदवारांची नावं निश्चित

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळेंनी भगरे यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली. इतकंच नाही, तर राखी बांधतानाचा व्हिडीओ देखील सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केला.

दरम्यान, आज सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर टीका केली. महाराष्ट्र सरकारकडे लाडकी बहीण योजनेशिवाय बोलण्यासारखं काहीही उरलेलं नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी 200 कोटी रुपयांचा खर्च करुन जाहिरात दिली जाते हे दुर्दैव आहे. तेच पैसे आशा वर्कर्स आणि अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना दिले असते तर त्यांची दिवाळी गोड झाली असती. आमचं सरकार आल्यानंतर या योजनेत आम्ही आणखी सुधारणा आणणार आहोत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजितदादांना राखी बांधणार का?

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांना तुम्ही आज राखी बांधणार का? असा प्रश्न पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारला. यावर सुप्रिया सुळे हसल्या आणि म्हणाल्या, माझा आज दिवसभर नाशिकचा दौरा आहे. रात्री 10 ते 11 पर्यंत इथल्या कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी प्रोग्राम ठरवला आहे. त्यामुळे आधी लगीन कोंडाण्याचं, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विषय संपवला.

Supriya Sule on Ajit Pawar Rakshabandhan
Vidhan Sabha Election : महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजप पराभूत होणार; आजचं मरण उद्यावर ढकललंय, ठाकरे गटाची टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com