Nashik News: नाशिकमध्ये मनाई आदेश: 15 दिवस 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी; नेमकं कारण काय?

Lok Sabha Election 2024: नाशिक शहरात उद्यापासून पुन्हा मनाई आदेश लागू करण्यात येत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी निर्णय घेण्यात आला आहे.
Nashik News Prohibitory Order
Nashik News Prohibitory OrderSaam Tv

अभिजीत सोनवणे साम टीव्ही, नाशिक

राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत (Lok Sabha Election 2024) आहे. नाशिक शहरात उद्यापासून पुन्हा मनाई आदेश लागू करण्यात येत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. २४ एप्रिल ते ०८ मे पर्यंत १५ दिवसांसाठी शहरात मनाई आदेश (Prohibitory Order In Nashik) लागू करण्यात आला आहे.

मनाई आदेशाच्या कालावधीत पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचे आंदोलन अथवा सभा घेता येणार नाही. या कालावधीमध्ये स्फोटक पदार्थ, शस्त्र बाळगण्यास, शस्त्र जमा करण्यास अथवा विक्री करण्यास (Nashik News) मनाई आहे. तसेच या कालावधीत पुतळ्याचे दहन करण्यास देखील सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

नाशिकमध्ये २४ एप्रिल ते ०८ मे या कालावधीत ५ पेक्षा जास्त लोकं एकत्र येण्यासाठी पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक आहे. विना परवानगी मोर्चे आणि आंदोलनांना मनाई करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची आदर्श आचासंहिता (Code Of Conduct) तसंच वेगवेगळ्या कारणांवरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी निर्णय घेण्यात आला आहे.

२४ एप्रिल ते ०८ मे या कालावधीत पूर्वपरवानगी शिवाय पाच किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना एकत्र जमण्यास मनाई (Prohibitory Order) आहे. सभा किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. प्रक्षोभक भाषण आणि वर्तवणूकीस देखील बंदी घालण्यात आलेली आहे.

Nashik News Prohibitory Order
Nashik Constituency : नाशिकच्या जागेवरून महायुतीत धुसफूस; शिंदेंचे उमेदवार पाडणार : समता परिषदेची आक्रमक भूमिका

राज्यातील विविध राजकीय पक्षांमध्ये फूट (Lok Sabha Election) पडलेली आहे. त्यामुळे अनेकदा आरोप-प्रत्यारोप, सामाजिक आणि राजकीय प्रकरणांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. याच पार्श्‍वभूमीवर शहरात शांतता कायम राहावी. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्‌भवू नये, यासाठी शहरात १५ दिवसांसाठी मनाई आदेश लागू केले आहेत.

Nashik News Prohibitory Order
Nashik Lok Sabha: महायुतीमधील नाशिकचा तिढा कायम! अजित पवार गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने वाढलं शिंदे गटाचं टेन्शन?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com