विधानसभा निवडणुकीदरम्यान नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. नाशिकमध्ये मनसेमध्येच राडा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मनसेच्या उमेदवाराविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील मनसेच्या उमेदवारासह चौघांविरोधात मनसे जिल्हा सचिवाच्या घरी जाऊन जबरी लूट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस तपास करत आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली असून मनसेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे मनसेच्या उमेदवारासह चौघांविरोधात आडगाव पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये मनसेत चाललय तरी काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. विधानसभा निवडणुकीचा गोल्फ क्लब येथिल शिवनेरी विश्रामगृहावर निवडणूक खर्च निवडणूक निरीक्षक यांच्याकडे सादर केला नाही म्हणून कुरापत काढून पूर्व विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रसाद (बाळासाहेब) दत्तात्रय सानप यांच्यासह चौघांनी आडगाव शिवारातील महालक्ष्मीनगर येथे राहणाऱ्या मनसेचे जिल्हा सचिव योगेश नाना पाटील यांच्या घरी जाऊन शिवीगाळ आणि दमदाटी केली.
योगेश पाटील यांच्या घरातील लॉकरमधून बाळजबरीने ८ लाख ८४ हजार रुपयांची रोकड तसेच पाटील यांच्या आईच्या गळ्यातील जुनी अडीच तोळे वजनी सोन्याची पोत असा सुमारे ९ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज जबरीने लुटून नेण्याची घटना शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमाराला घडली. या घटनेबाबत मनसे जिल्हा सचिव जनहित व विधी विभागाचे योगेश पाटील यांनी आडगाव पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार प्रसाद सानप, उमाकांत एंगडे, नितीन घुगे आणि संकेत मोहिते या ४ संशयित आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३५१(२), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.