Nashik News : नाशिकमध्ये अग्नी तांडव सुरूच! धावत्या कंटेनरला भीषण आग

नाशिकमध्ये आठ दिवसात गाड्यांमध्ये आग लागण्याची तिसरी घटना आहे.
Nashik Fire News
Nashik Fire NewsSaam Tv

नाशिक - मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकच्या (Nashik) पाथडी फाटा जवळ रात्री धावत्या कंटेनरला भीषण आग लागली होती. या आगीत जीवितहानी झाली नाही मात्र वितहानी झाली आहे. मुंबईहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अग्निशमन विभागाचे कर्मचारी तात्काळ दाखल झाले.

Nashik Fire News
Gujarat : भूपेंद्र पटेल आज दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; 'या' चेहऱ्यांना मिळणार संधी? पाहा संपूर्ण यादी

अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले मात्र, या आगीत कंटेनर पूर्णपणे जळाला आहे. सुदैवाने यात काेणत्याही प्रकारणी जिवितहानी झाली नाही.ही आग नेमकी कशी लागली यांची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आगेत गाडीमध्ये असलेले इतर साहित्य जळून खाक झाला आहे.

Nashik Fire News
Pune News : पुण्यात रिक्षा संघटनांकडून आज पुन्हा 'बंद'ची हाक; काय आहे कारण? वाचा...

नाशिकमध्ये आठ दिवसात गाड्यांमध्ये आग लागण्याची तिसरी घटना आहे. तीन दिवसांपूर्वी सिन्नर फाटा येथे एसटी बसने अपघातांनंतर पेट घेतल्याची घटना ताजी असतांना पुन्हा एका कंटेनरला आग लागल्याची घटना समोर आली आहे त्यामुळे नशिलमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com