Devlali Vidhan Sabha : देवळाली मतदारसंघात महायुतीमध्ये वादाची ठिणगी; भूमिका स्पष्ट करण्याबाबत सरोज अहिरे यांची शिंदेंकडे विनंती

Nashik News : विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी बंड झाले आहेत. त्यानुसार देवळाली मतदारसंघात देखील बंडखोरी झाली आहे.
Devlali Vidhan Sabha
Devlali Vidhan SabhaSaam tv
Published On

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये तणावाचे वातावरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. महायुतीत हि जागा अजित पवार गटाला सुटल्याने येथे सरोज अहिरे याना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव यांनी देखील उमेदवारी दाखल केली आहे. यामूळे प्रचाराचा आता पेच निर्माण झाला असून एकनाथ शिंदे यांनी काय ती भूमिका स्पष्ट करावी, कार्यकर्त्यांचे मरण होऊ देऊ नका; अशी विनंती सरोज अहिरे यांनी केली आहे. 

विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी बंड झाले आहेत. त्यानुसार देवळाली मतदारसंघात देखील बंडखोरी झाली आहे. २२ तारखेला महायुतीचा घटक पक्ष म्हणून (NCP) राष्ट्रवादी पक्षाकडून अजित पवारांनी अधिकृत AB फॉर्म देऊन (Mahayuti) महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून सरोज अहिरे यांच्या नावाची घोषणा केली. तर शिंदे गटाकडून राजश्री अहिरराव यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून त्यांनी माघार घेतलेली नाही. यामुळे महायुतीत लढत राहणार आहे. 

Devlali Vidhan Sabha
Pune News : इच्छुकांनी भरले महापालिकेचे कोट्यवधी रुपये; महापालिकेच्या तिजोरीत १५ कोटी जमा

याबाबत बोलताना सरोज अहिरे या म्हणाल्या, कि काही स्थानिक राजकारण तिथे झालेल असेल असं मला वाटतं. काही विघ्न दोषी लोक या राजकारण करण्यामागे बांधलेले आहेत. मात्र मायबाप जनता त्यांच्या षडयंत्र २० तारखेला मोडीत काढेल. पाच वर्षाच्या कार्यकाळात विकासाची काम केली आहेत. पाच वर्षांचा प्रवास अतिशय आनंदाचा राहिला आहे. अनेक डावपेच साधले जातील, मात्र त्यांच्या या डावपेचंना डावलून जनता मला निवडून देईल. जनता विकास कामाला समोर ठेवून मला भरभरून आशीर्वाद देईल; असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

Devlali Vidhan Sabha
Ambarnath News : अंबरनाथमध्ये उबाठाचे उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप; अपक्ष उमेदवार सुनील अहिरे यांची तक्रार

तसेच माझ्या पक्षाला महायुतीला कुठेही पत्र देण्याची वेळ आली नाही की या AB फॉर्मला, या उमेदवाराला आमचा पाठिंबा नाही. ही नाचक्की झालेली नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, ही तिन्ही नेत्यांना विनंती आहे. जेणेकरून काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहणार नाही. भाजपचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत प्रचारात आनंदाने उभे आहेत. पक्षाचा आदेश एका प्रकारे त्यांना मिळालेला दिसतोय. त्यामुळे मी महायुतीची अधिकृत उमेदवार म्हणून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित दादा यांचा चेहरा आणि त्यांनी केलेली काम पुढे ठेवून हा काम प्रचार सुरू ठेवणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com