Nashik Firing News: नाशिकच्या जयभवानी परिसरात मध्यरात्री गोळीबाराचा थरार; धक्कादायक घटनेचा VIDEO आला समोर

Nashik News Today: नाशिकमध्ये देखील गोळीबाराची घटना घडली आहे. जय भवानी परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
Nashik Jai Bhavani area unknown person Firing
Nashik Jai Bhavani area unknown person Firing Saam TV
Published On

तबरेज शेख, साम टीव्ही नाशिक

Nashik Latest Crime News

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. किरकोळ कारणावरून गोळीबारासारख्या गंभीर घटना घडत आहेत. एकीकडे उल्हासनगर येथे भाजप आमदाराने शिवसेनेच्या नेत्यावर गोळीबार केल्याची घटना ताजी असताना दुसरीकडे नाशिकमध्ये देखील गोळीबाराची घटना घडली आहे. जय भवानी परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nashik Jai Bhavani area unknown person Firing
Ganpat Gaikwad News: आमदार गणपत गायकवाड यांना दुहेरी झटका; गुन्हा दाखल होताच आमदारकीही जाणार?

जय भवानी रोड परिसरातील फर्नांडिस वाडी येथे शुक्रवारी (२ फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास अज्ञात टोळक्यांनी गोळीबार केला. या गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (Viral Video) कैद झाली आहे. मित्रासोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून हा गोळीबार झाला असल्याची प्राथामिक माहिती आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी अशी, मागणी नागरिक करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, साई श्रद्धा अपार्टमेंटमध्ये बरखा उज्जैनवाल आणि त्यांचे पती अजय उज्जैनवाल राहतात. शुक्रवारी रात्री ते घरात झोपले असताना अचानक त्यांच्या इमारतीखाली काचेच्या बाटल्या फोडण्याचा आवाज आला. (Latest Marathi News)

त्यांनी खिडकीतून डोकावून बघितले असता, संशयतांनी शिवीगाळ केली बरखा यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. तसेच संशयितांनी उज्जैनवाल यांना धमकी देत राहुलला समोर आणा त्याचा मुडदा पाडतो, अशी धमकी दिली. संशयितांच्या हातात कोयते असल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या भागात उपनगर पोलीस रात्रीची गस्त घालत नसल्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. या गोळीबाराच्या घटनेच्या दोन दिवस अगोदर देखील असाच गोळीबार झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मात्र, पोलिसांकडून त्याची कुठलीही दखल घेतली गेली नाही.

Nashik Jai Bhavani area unknown person Firing
Devendra Fadnavis : उल्हासनगरात भाजप आमदारानं केलेल्या गोळीबार प्रकरणाची होणार उच्चस्तरीय चौकशी; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com