nashik news
nashik news saam tv

Nashik : धक्कादायक! खिचडीतून ८ गतीमंद विद्यार्थ्यांना विषबाधा ? दोघांचा मृत्यू, इतरांची प्रकृती गंभीर

नाशिकमधून मोठं वृत्त समोर आलं आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये (Igatpuri) गतीमंद मुलांच्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. इ
Published on

Nashik News : नाशिकमधून मोठं वृत्त समोर आलं आहे. नाशिकच्या इगतपुरीमध्ये (Igatpuri) गतीमंद मुलांच्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. इगतपुरीमधील अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालयातील धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेमुळे दुर्देवाने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

nashik news
Pimpri Chinchwad : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षाचा मुलगा गंभीर जखमी; पालकांचा पिंपरी चिंचवड महापालिकेवर राेष

नाशिकच्या इगतपुरीमधील अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालयात विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. या धक्कादायक घटनेत उलट्या होऊन दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. सदर विद्यार्थ्यांचा पहाटे पाच वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांना उलट्या होऊन मृत्यू झाला आहे.

सदर घटनेत हर्षल गणेश भोईर, वय २३, रा.भिवंडी, जि. ठाणे आणि मोहम्मद जुबेर शेख,११ रा. नाशिक या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर प्रथमेश निलेश बुवा वय १७ आणि देवेंद्र कुरुंगे वय १५ वर्ष या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. गतीमंद विद्यार्थ्यांना अन्नातून अथवा पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

nashik news
Solapur : महिला अत्याचार प्रकरणी श्रीकांत देशमुखला 'या' तारखेपर्यंत अटकेपासून मिळालं सरंक्षण

नेमकं काय घडलं ?

मंगळवारी रात्री खिचडीचे जेवण इगतपुरीमधील अनुसयात्मजा गतीमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात आले होते . मात्र, हे जेवण केल्यानंतर विद्यालयातील गतीमंद विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. जेवण किंवा पाणी प्यायल्यानंतर विद्यालयातील ८ विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास सुरु झाला.

सदर विद्यार्थ्यांमधील दोन जणांचा पहाटे पाच वाजेच्या सुमारास उलट्या होऊन दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्याच वेळी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर चार विद्यार्थ्यांवर इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयातील उपचार सुरू आहेत. सदर घटनेने गतीमंद निवासी विद्यालयात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com