Nashik News: आधी वास्तूदोष सांगून नकार, आता बदलीनंतर बंगला सोडेनात; नाशिकच्या तत्कालीन आयुक्तांचा गजब कारभार

Nashik Municipal Corporation: नाशिकला महापालिका आयुक्त म्हणून अशोक करंजकर यांची बदली झाल्यानंतर वास्तूदोषाचे कारण दाखवत शासकीय निवस्थान नाकारणारे तत्कालीन आयुक्त अशोक करंजकर
Ashok Karanjkar
Nashik Municipal Corporation Commissioner Ashok Karanjkar: SAAM TV
Published On

नाशिक : कधी गैरहजर, तर कधी सुट्टीवर अशा एक ना अनेक कारणांमुळं चर्चेत असणारे नाशिकचे तत्कालीन पालिका आयुक्त अशोक करंजकर आता पुन्हा चर्चेत आले आहेत. करंजकर यांची बदली झाल्यानंतर आता जवळपास ४० दिवस उलटले आहेत, पण सरकारी बंगला सोडण्याचं ते नाव घेत नाहीत. विशेष म्हणजे त्यांनी सुरुवातीला वास्तूदोषाचं कारण देत या बंगल्यात राहण्यास नापसंती दर्शवली होती.

नाशिकचे तत्कालीन महापालिका आयुक्त अशोक करंजकर हे त्यांच्या गैरहजरीच्या कारणावरून चांगलेच चर्चेत होते. दरवेळेस काहीना काही कारण सांगून नेहमीच सुट्टीवर जात असल्यानं महापालिका कारभाराचा चांगलाच बोऱ्या वाजला होता. आता त्यांची बदली झाली आहे. सुरुवातीला वास्तूदोष असल्याचं कारण सांगून शासकीय निवासस्थान नाकारलं होतं. पण आता बदलीला जवळपास ४० दिवस उलटले, पण तेच नको असलेले सरकारी निवासस्थान त्यांनी अद्याप सोडलेलं नाही. याउलट या बंगल्यात राहण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ मागितल्याची चर्चा आहे.

Ashok Karanjkar
Nashik Crime: बागेत फिरायला गेला असताना गाठलं, टोळक्याच्या हल्ल्यात १८ वर्षीय मुलाचा मृत्यू; नाशिक हादरलं

करंजकर यांच्या या अशा कारभारामुळं आताच पदभार स्वीकारलेल्या नवनियुक्त आयुक्त मनीषा खत्री यांची मात्र अडचण होत आहे. याच मुख्य कारण म्हणजे कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त पालिकेच्या अनेक कामाच्या बैठका या सरकारी निवसस्थानी होत असतात. नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असणारे अशोक करंजकर यांना हटवत त्यांच्या जागी मनीषा खत्री यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान दीड महिना होऊनही करंजकर यांनी शासकीय निवासस्थान सोडलं नाही. नाशिकच्या गडकरी चौकात असलेले 'रायगड' या नावाचे आयुक्तांचे सरकारी निवासस्थान आहे. या ठिकाणी आणखी काही काळ राहायचं आहे, असं सांगून मुदतवाढ मागितल्याचे सांगितले जाते.

Ashok Karanjkar
Nashik News: जुना वाद, हवेत गोळीबार; नाशिकमध्ये उडाला टोळीयुद्धाचा भडका

आधी बदलीसाठी प्रयत्न, आता बदलीनंतर मुक्कामासाठी धडपड

स्वत:च्या खासगी निवासस्थानी राहूनही बदलीची शक्यता वाटू लागल्याने करंजकर अखेरच्या क्षणी सरकारी बंगल्यावर राहायला गेले. आता तब्बल चाळीस दिवस उलटूनही त्यांनी सरकारी निवासस्थान सोडलेले नाही. विभागीय आयुक्त कार्यालय असो किंवा महापालिका कार्यालय अधिकाऱ्यांनी स्वत:च्या बसण्याच्या दिशा बदलणे, टेबल खुर्ची म्हणजेच फर्निचरमध्ये बदल करणे, केबिनचे रंग बदलणे असे अनेक बदल करणे आणि त्यावर पाण्यासारखा पैसा खर्च करणे हे प्रकार नाशिक महापालिकेमध्ये नवीन नाहीत. पण हाच पैसा शहरातल्या विकासकामांसाठी वापरला गेला तर हे वास्तूदोष दूर होतील की नाही हे माहीत नाही, पण विकासकामांमुळं नाशिकचा चेहरामोहरा नक्कीच बदलेल, अशा प्रतिक्रिया नागरीक व्यक्त करत आहेत.

Ashok Karanjkar
Nashik Crime: बागेत फिरायला गेला असताना गाठलं, टोळक्याच्या हल्ल्यात १८ वर्षीय मुलाचा मृत्यू; नाशिक हादरलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com