Nashik News: जुना वाद, हवेत गोळीबार; नाशिकमध्ये उडाला टोळीयुद्धाचा भडका

Nashik Firing News: गेल्या काही दिवसापासून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून खून, हाणामाऱ्याच्या घटना रोजच दाखल होताना दिसत आहेत.
Panchavati Nagchowk Firing
Panchavati Nagchowk Firing SaamTV
Published On

नाशिक : नाशिकच्या पंचवटीतील नागचौक येथे रात्री दहाच्या सुमारास दोन गटांमध्ये जुन्या वादावरून टोळीयुद्ध झाले. या टोळीयुद्धात दोनजण जखमी झाले असून हवेत फायरिंग झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून खून, हाणामाऱ्याच्या घटना रोजच दाखल होताना दिसत आहेत. या प्रकरणी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये परस्परांविरोधात गुन्हे दाखल केले असून यातील संशयित आरोपी हे फरार आहेत. तर दोनजण जखमी झाले आहेत. या घटनेनं परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली असून घटनेचा अधिक तापस पंचवटी पोलीस करीत आहेत.

शिर्डीत दुहेरी हत्याकांड

दरम्यान, शिर्डीमध्ये साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्येनं संपूर्ण शिर्डीत खळबळ उडाली आहे. भल्या पहाटे कामावर जाताना तिघांवर अज्ञाताकडून चाकूने हल्ला करण्यात आला. तिघांवर वेगवेगळ्या भागांमध्ये हल्ला करण्यात आला. या थरारक घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे.

Panchavati Nagchowk Firing
Shirdi Murder News: शिर्डी दुहेरी हत्याकांड; थरारक हत्येचं दुसरं CCTV फुटेज समोर, अंगावर काटा आणणारा Video पाहा

वांद्रे टर्मिनसवर महिलेवर अत्याचार

मुंबईच्या वांद्रे टर्मिनस या ठिकाणी एका महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून अवघ्या दीड तासात एका हमालाला अटक केली आहे. ५५ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपावरुन या हमालाला अटक करण्यात आली आहे. ही महिला हरिद्वार या ठिकाणाहून ट्रेनने मुंबईत आली. शनिवारी रात्री तिची ट्रेन वांद्रे टर्मिनस या ठिकाणी पोहोचली होती. ती रिकाम्या ट्रेनच्या कोचमध्ये एकटीच झोपली होती.

याच गोष्टीचा फायदा घेत एका हमालाने या महिलेवर अत्याचार केला. महिलेच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वांद्रे रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला शोधलं आणि त्याला अटक केली. आरोपीकडून अधिक तपास वांद्रे रेल्वे पोलीस करत आहेत.

Panchavati Nagchowk Firing
Maharashtra Politics : शिवसेनेत गटबाजी उफाळली? एकनाथ शिंदेंचं नाव घेत दादांनी स्पष्टच सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com