अभिजीत सोनवणे, नाशिक|ता. १४ जुलै २०२४
राज्यामध्ये खून, दरोडे, मारामाऱ्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुणे, नाशिक, नागपूरमध्ये टोळी युद्धांचा भडका पाहायला मिळत आहे. अशातच नाशिकमध्ये तुरुंगातून सुटून आलेल्या एका कुख्यात गुंडाची जंगी मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या संपूर्ण मिरवणुकीचा आणि या सत्कार सोहळ्याचा व्हिडियो सोशल मीडियावर टाकला आणि पोलिसांच्या हाती लागताच सुमोटो कारवाई अंतर्गत भाईंना पुन्हा पोलिसांनी जेलवरीला पाठवले आहे.
नाशिक शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. शहरात टोळी युद्धांमधून राडा झाल्याच्या घटना वारंवार समोर येत असतानाच आता एका जेलमधून सुटलेल्या गुंडाची शहरात जंगी मिरवणूक काढल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हर्षद पाटणकर असे या तुरुंगातून सुटलेल्या गुंडाचे नाव असून हर्षदला जुलै २०२३ मध्ये एमपीडीए कायद्यानुसार नाशिक रोड कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध केले होते. हर्षदची मंगळवारी कारागृहातून सुटका झाली. सुटकेनंतर त्याच्या साथिदारांनी शहरातून त्याची जंगी मिरवणूक काढली. शहरातील तडीपार गुंड, सराईत गुन्हेगारांसह टवाळखोरांचाही या मिरवणुकीत सहभाग होता. शहरातील शरणपूर रोडवरवरुन आंबेडकर चौक, साधू वासवाणी रोड परिसरातून ही मिरवणूक निघाली.
धक्कादायक बाब म्हणजे यावेळी गाड्यांचा ताफा, कर्णकर्कश हॉर्न, अर्वाच्च भाषेत घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. या रॅलीचे व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत या धक्कादायक प्रकारामुळे या गुंडांनी एकप्रकारे पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिले का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित पाटणकरसह मिरवणुकीत सहभागी असलेल्या सात जणांवर गुन्हा दाखल केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.