रेल्वेखाली उडी घेत माय-लेकीची आत्महत्या; धक्कादायक घटनेने नाशिक हादरले

मृत राखी हिचे वडील सोलापूर येथे खासगी ठिकाणी नोकरीला आहेत.
Nashik Crime News in Marathi, Nashik Latest Marathi News, Nashik News
Nashik Crime News in Marathi, Nashik Latest Marathi News, Nashik NewsSaam TV

नाशिक : नाशिकच्या भगूर येथे राहणाऱ्या मायलेकींनी गीतांजली एक्स्प्रेस खाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. देवळाली कॅम्प पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून तपास सुरु केला आहे. (Nashik Crime News in Marathi)

Nashik Crime News in Marathi, Nashik Latest Marathi News, Nashik News
गाव उजळायला गेला अन् कुटुंबावर अंधार पडला; विजेचा धक्का लागल्याने कामगाराचा मृत्यू

अनिता बाळासाहेब शिरोळे (वय ४२) व त्यांची मुलगी राखी बाळासाहेब शिरोळे (वय २२), दोघी रा. बार्न्सस्कूलजवळ, मल्हारवाडी, भगूर) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. त्यांनी रविवारी कँम्प येथील एअर फोर्स स्टेशनच्या गेट जवळील पाळदे मळा परिसरात मुंबईकहून नाशिककडे येणाऱ्या गितांजली एक्स्प्रेस खाली उड्या घेत आत्महत्या केली. रेल्वे प्रशासनाने देवळाली कँम्प पोलिसांना माहिती कळविली.

त्यानंतर पोलिसांनी दाखल होत मृतदेहांचा पंचनामा केला. दरम्यान, मृत राखी हिचे वडील सोलापूर येथे खासगी ठिकाणी नोकरीला आहेत. बार्न्स स्कूलजवळ राखीसह तिची आई, भाऊ, बहीण  व चुलते राहत असल्याचे समजते. या घटनेची माहित तिच्या वडिलांना व कुटुंबाला दिली असता त्यांना धक्का बसला. दोघींचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोलिस चौकशी करणार आहेत. तेव्हाच या दुहेरी आत्महत्येचे कारण कळू शकण्यास मदत होणार आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com