ट्रक-मोटारसायकलची समोरासमोर धडक; जवानासह दोघांचा जागीच मृत्यू, संभाजीनगरमध्ये हळहळ

नाशिक-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव शिवारात भरधाव ट्रक आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात एसएसबी जवान सोमनाथ जाधव आणि हिरामण माळी यांचा जागीच मृत्यू झाला.
Nashik-Chhatrapati Sambhajinagar Highway Accident:
Nashik-Chhatrapati Sambhajinagar Highway Accident:
Published On: 

नाशिक-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने अपघातांसाठी कुख्यात असलेल्या नांदगाव शिवारातील एका धोकादायक वळणावर गुरुवारी (ता. १३) एक अत्यंत भीषण अपघात घडला. भरधाव ट्रक आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या या जोरदार धडकेत केंद्रीय सशस्त्र सीमा दलातील (SSB) एका जवानासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय सशस्त्र सीमा दलात (बिहार) कार्यरत असलेले जवान सोमनाथ गोरखनाथ जाधव आणि हिरामण माळी हे एका मोटारसायकलवरून जात होते. नांदगाव शिवारातील एका धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, मोटारसायकल आणि जवानाचा मोबाईल यांचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात सोमनाथ जाधव आणि हिरामण माळी हे दोघेही गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले.

Nashik-Chhatrapati Sambhajinagar Highway Accident:
Fact Check : एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची बदली? स्वतःच समोर येऊन सांगितलं सत्य

रजेवर आलेले जवान ड्युटीवर परतत असताना काळाने गाठले

मृत जवान सोमनाथ जाधव हे बिहारमधील युनिटमध्ये कार्यरत होते. ते १३ ऑक्टोबरपर्यंत रजेवर आपल्या घरी आले होते. रजा संपवून ते पुन्हा आपल्या ड्युटीवर परतण्यासाठी निघाले होते. प्राथमिक अंदाजानुसार, हिरामण माळी हे सोमनाथ जाधव यांना मनमाड रेल्वे जंक्शनवर सोडण्यासाठी जात असावेत, यादरम्यानच वाटेत हा घात झाला.

Nashik-Chhatrapati Sambhajinagar Highway Accident:
राहुल गांधींना मोठा धक्का! निवडणूक आयोगाविरोधातील याचिकेत तब्बल १४ त्रुटी; सुनावणी लांबणीवर?

घटना समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. तसेच, पोलिसांनी तात्काळ बिहारमधील संबंधित युनिटशी संपर्क साधून जवानाच्या अपघाती मृत्यूची दुर्दैवी माहिती दिली आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर आणि परिसरात शोककळा पसरली असून, राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com