Nashik News: मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे पोलिसांच्या ताब्यात; प्रकरण काय?

Nashik News: अद्वय हिरे यांना नाशिक गुन्हे शाखेने भोपाळमधून ताब्यात घेतले आहे.
Advay Hire News
Advay Hire NewsSaamtv
Published On

तबरेज शेख, प्रतिनिधी

Nashik Breaking News:

नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अद्वय हिरे यांच्यावर शिक्षक भरती प्रकरणी मालेगावमध्ये गुन्हा दाखल झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून ते फरार होते. अखेर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाजपमधून (BJP) शिवसेना ठाकरे गटात गेलेले अद्वय हिरे यांना नाशिक (Nashik) गुन्हे शाखेने भोपाळमधून ताब्यात घेतले आहे. अद्वय हिरे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी मालेगावच्या रमजानपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. रेणुका सूतगिरणीसाठी NDCC बँकेकडून साडेसात कोटी कर्ज घेतले होते, ते न फेडल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

या प्रकरणी अद्वय हिरे (Adavay Hire) यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टाने जामीन नाकारल्याने ते अनेक दिवसांपासून फरार होते. अखेर त्यांना आज नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने पहाटेच्या सुमारास भोपाळहून (Bhopal) ताब्यात घेतले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Advay Hire News
Wardha News : वर्धेतील गोसंवर्धन गोरस भंडारचा संप; कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीचा निषेध

दरम्यान, ही बँकेची केस आठ वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना पक्षफुटीनंतर अद्वय हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्याआधी ते भाजपमध्ये होते. तसेच अद्वय हिरे हे नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्षही राहिले आहेत.

नाशिकचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांचे कट्टर विरोधक म्हणून अद्वय हिरे यांची ओळख आहे. दादा भुसे यांच्या दबावामुळेच आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता.  (Latest Marathi News)

Advay Hire News
Viral Video: खतरनाक स्टंट! स्कॉर्पिओचा सुसाट वेग अन् टपावर फटाक्यांची आतिषबाजी; धक्कादायक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com