Maharashtra Politics: महायुतीच्या विजयात लाडक्या बहिणींचा नव्हे, तर साधू-संतांचा मोठा वाटा – नरेंद्र महाराज

Narendra Maharaj: महायुतीने विधानसभेवर आपला झेंडा फडकावला, हा विजय लाडकी बहीण योजणेमुळे झाला असे महायुतीचे नेते सांगत होते, पण हा विजय साधू संतांमुळे झाला आहे, असे विधान नरेंद्र महाराज यांनी केले आहे.
narendra maharaj
narendra maharaj Saam Tv
Published On

अमोल कलये,साम टीव्ही

रत्नागिरी: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले असले, तरी या विजयाचे खरे श्रेय लाडकी बहीण योजनेला नसून साधू-संतांना जाते, असे मत जगतगुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठाचे महंत नरेंद्र महाराज (नाणीज पीठ) यांनी व्यक्त केले आहे.यावेळी ते रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते.

निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने 'लाडकी बहीण' योजना लागू केली होती, ज्यामध्ये महिलांच्या पदरात दरमहा १,५०० रुपये पडू लागले. त्यामुळे महायुतीच्या विजयामागे महिलांच्या पाठिंब्याची मोठी भूमिका असल्याचे बोलले जात होते. मात्र, हे यश हिंदू समाजात साधू-संतांनी निर्माण केलेल्या जागृतीमुळे मिळाले आहे, असा दावा नरेंद्र महाराजांनी केला.

narendra maharaj
Ratnagiri News : शाडूमातीसाठी मूर्तिकारांना मिळणार अनुदान; गणेशोत्सवात होणार फायदा

ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत वेगळे चित्र होते, मात्र विधानसभेच्या निवडणुकीत संघ आणि आम्ही साधू-संतांनी परिस्थिती बदलली. यामागे लाडकी बहीण योजनेचा काहीही परिणाम नाही. आम्ही हिंदू समाजातील लोकांना जागृत केले, की आता काळाची गरज आहे. त्यामुळे हे चित्र निर्माण झाले.

अजित दादांनाही विश्वास नव्हता!

नरेंद्र महाराज पुढे म्हणाले, अजित दादांना वाटत होते की, त्यांना जास्तीत जास्त १०-१२ जागा मिळतील, पण निकाल वेगळाच लागला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाटते की, त्यांच्या योजनांमुळे हे घडले, पण तसे नाही. या विजयामागे साधू-संतांचे योगदान आहे. जर मुस्लिम समाज हिरवे झेंडे घेऊन संघटित होत असेल, तर हिंदूंनीही जागृत झाले पाहिजे हे आम्ही लोकांना समजावले.

narendra maharaj
कृषी मंत्र्यांना २ वर्षांची शिक्षा, कोकाटेंची आमदारकी रद्द होणार? कोट्यातलं घर लाटण्यासाठी सरकारची फसवणूक

दिल्लीचे चित्रही बदलले!

कुंभमेळ्यात ‘डरेंगे तो मरेंगे’ हा संदेश दिल्यामुळे सर्व साधू-संत जागृत झाले. आमच्या लांब असलेल्या शंकराचार्यांनाही त्यात उतरावे लागले. त्यामुळे महाराष्ट्रच नव्हे, तर दिल्लीतही वेगळे चित्र पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी दिल्लीच्या निकालावर देखील भाष्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com