Maharashtra Politics : विनायक राऊत खासदार आहे की आमचे ऑफिसबॉय? आमदार नितेश राणेंची खोचक सवाल

"विनायक राऊत खासदार आहेत की नारायण राणेंच्या ऑफिसमधील चहा देणारे ऑफिसबॉय"
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

Maharashtra Politics : नारायण राणेंच्या खासगी सचिवाने त्यांच्या MSME खात्याच्या माध्यमातून अनेकांना गंडा घातला. मोदींना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी नारायण राणेंना समज देऊन मंत्रीपद काढून घेण्याचा इशारा दिला अशी टीका विनायक राऊत यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.

Maharashtra Politics
Uday Samant : संजय राऊत यांना मंत्री उदय सामंत यांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले,'महिला भगिनींना...'

विनायक राऊत खासदार आहेत की नारायण राणेंच्या ऑफिसमधील चहा देणारे ऑफिसबॉय असा सवाल उपस्थित केला आहे. नारायण राणेंचे नरेंद्र मोदी यांच्या बरोबर कसे संबंध आहेत याची चिंता विनायक राऊत यांनी करू नये असा सल्ला देखील नितेश राणे यांनी विनायक राऊतांना दिला आहे.

पहिल्यांदा विनायक राऊत यांनी आपले संबंध उद्धव ठाकरेंशी चांगले ठेवावे कारण विनायक राऊत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटण्यासाठी कधी, केव्हा आणी कसे प्रयत्न करत आहेत हे जर मी सांगितल तर विनायक राऊत यांचे उरले सुरले कपडे राहणार नाहीत. विनायक राऊत यांनी नरेंद्र मोदी, नारायण राणे ही मोठी मोठी नावे घेवू नये. जेवढी आपली लायकी आहे तेवढच त्यांनी बोलावं अशी सडकून टीकाही त्यांच्यावर करण्यात आली.

Maharashtra Politics
Mumbai News: मुंबई महापालिकेची मोठी कारवाई; 'या' प्रकल्पात अडथळा ठरणारी ५५ अनधिकृत बांधकामे तोडली

काय म्हणाले होते खासदार विनायक राऊत ?

नारायण राणे यांच्या खासगी सचिवाने अनेकांना गंडा घातल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राणेंच्या खासगी सचिवाला दम दिला होता, असा विनायक राऊत यांनी केला. आधी या सचिवाला काढून टाका अन्यथा तुमचे खाते काढून घेतले जाईल, असा थेट दम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणेंना दिल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com