Farmer Protest: महामार्गावर चक्काजाम करणाऱ्यांवर मोठी कारवाई; बच्चू कडू, राजू शेट्टींसह २५०० आंदोलकांवर गुन्हा

Bachchu Kadu And Raju Shetty: नागपूरमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलकांविरोधात आता कारवाई करण्यात आली आहे. बच्चू कडू, राजू शेट्टींसह २५०० आंदोलकांवर गुन्हा करण्यात आला.
Bachchu Kadu Farmer Protest
Bachchu Kadu Farmer Protest saam tv
Published On

Summary -

  • नागपूरमध्ये शेतकरी आंदोलकांविरोधात मोठी कारवाई

  • आंदोलनादरम्यान महामार्गावर चक्काजाम करण्यात आला होता

  • बच्चू कडू, राजू शेट्टींसह २५०० आंदोलकांवर गुन्हा दाखल

  • पोलिसांनी हिंगणा पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल

शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि सातबारा कोरा करावा यासह शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये आंदोलन केले. त्यांनी सलग २४ तास नागपूर-हैदराबाद महामार्गावर चक्काजाम आंदोलन करत वाहतूक कोंडी केली. त्यांच्या या आंदोलनाला अनेक शेतकरी नेत्यांनी देखील पाठिंबा दिला आणि ते या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाद्वारे वाहतूक कोंडी करत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत केल्या प्रकरणी नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्यासह जवळपास २५०० आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बच्चू कडू, राजू शेट्टी , महादेव जानकर , रविकांत तुपकर, वामनराव चटप यांच्यासह अडीच हजारांच्या जवळपास आंदोलनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगणा पोलिस ठाण्यात या सर्वांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. चक्कजाम करून २४ तासांपेक्षा जास्तवेळ वाहतूक रोखली असल्याने या सर्व नेत्यांसह आंदोलकांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान बेकायदेशीर महामार्ग अडविणे आणि नागरिकांची गैरसोय केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Bachchu Kadu Farmer Protest
Bachchu Kadu: कोर्टाच्या आदेशानंतरही बच्चू कडू आंदोलनावर ठाम, म्हणाले - 'लोक उठ म्हणतील तेव्हाच उठू'| VIDEO

बेकायदेशीरपणे गर्दी जमवणे, नागरिकांचे जीवन आणि मालमत्ता धोक्यात आणणे आणि वाहतुकीला अडथळा आणणे यासारख्या विविध कलमांअंतर्गत या सर्व नेते आणि आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सहकार्य मिळावे अशी अट ठेवणाऱ्या आंदोलनासाठी हा मोठा धक्का आहे. सोबतच पोलिसांना सार्वजनिकपणे अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणात देखील कारवाईचे संकेत आहेत.

Bachchu Kadu Farmer Protest
Bachchu Kadu : बच्चू कडूंच्या आंदोलनाचा फटका, समृद्धी माहामार्गावर मोठी वाहतूक कोंडी| VIDEO

केंद्रीय कापूस खरेदी केंद्राजवळील मैदानात आंदोलनाची परवानगी असताना आंदोलकांनी वर्धा महामार्ग अडवला. यामुळे जवळपास ३० तासांहून अधिकवेळ वाहतूक कोंडी झाली. नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे देऊन निर्दशकांना चिथावणी दिल्याचाही ठपका नागपूर पोलिसांनी ठेवला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी २८ ऑक्टोबरपासून वर्धा मार्गावर आंदोलन केले. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

Bachchu Kadu Farmer Protest
Bachchu Kadu: कर्जमाफीसाठी मरायलाही तयार, बच्चू कडू ढसाढसा रडले; पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com