Taloda News
Taloda NewsSaam tv

Taloda News : पत्नीच्या उपचारासाठी पैसे मागत दिली बनावट सोन्याची माळ; सव्वापाच लाखात फसवणूक

Nandurbar News : तळोदा येथील अशोक गवळे व त्यांची पत्नी सुरेखाबाई हे भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करतात. याच दरम्यान त्यांची दोन व्यक्तींशी ओळख झाली
Published on

तळोदा (नंदुरबार) : पत्नी आजारी असल्याने पैशांची गरज आहे; असे सांगत सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यात रोख रक्कमेची मागणी केली. त्यानुसार बनावट सोन्याची माळ देऊन भाजी विक्रेत्याची पाच लाख २१ हजारांत फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत तळोदा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. 

तळोदा (Taloda) येथील अशोक गवळे व त्यांची पत्नी सुरेखाबाई हे भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करतात. याच दरम्यान त्यांची दोन व्यक्तींशी ओळख झाली. या ओळखीतून त्यांनी २१ ऑगस्टला गवळे यांच्या दुकानावर येत पत्नीची तब्येत बिघडली असून, उपचारासाठी पाच लाख मागितले. बदल्यात पाच लाखांपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे दागिने देण्याचे सांगितले. त्यासाठी धुळ्याच्या दवाखान्यात यावे लागेल, असे सांगून गवळे यांना सोन्याचे मणी देऊन २६ ऑगस्टला २१ हजारांची रोकड घेतली. 

Taloda News
Parbhani News : अतिवृष्टीत सात एकर कापूस उद्ध्वस्त; पाहून शेतकऱ्याला बसला धक्का, कुटुंबावर शोककळा

या नंतर गवळे यांना ३० ऑगस्टला सरकारी दवाखाना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात बोलावले. तेथे गवळे यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले. दरम्यान, बनावट (Fraud) सोन्याच्या मणीच्या माळा देऊन आपली फसवणूक झाल्याचे गवळे यांच्या लक्षात आले. पोलिस उपनिरीक्षक महेश निकम तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com