Shahada Police : दादागिरी करत महिलाची काढली छेड; ताब्यात घेत तरुणाची काढली गावभर धिंड

Nandurbar News : भररस्त्यावर दादागिरी करणे तसेच रस्त्याने जाणाऱ्या महिला व मुलींची छेड काढली जात असते, असा प्रकार घडल्यानंतर कान आणि हात धरून शहादा पोलिसांनी काढली गावभर धिंड काढत अद्दल घडविली
Shahada Police
Shahada Police Saam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : महिला व मुलींची छेड काढण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढले आहे. पोलीस प्रशासनाकडून या विरोधात पावले उचलली जात आहेत. तरी देखील दादागिरी करत छेड काढली जात आहे. अशाच प्रकारे एका तरुणाने महिलांची छेड काढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याला चांगलीच अद्दल घडविली आहे. पोलिसांनी या तरुणाची गावभर धिंड काढत ग्रामस्थांची माफी मागायला लावली आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात हा प्रकार घडला होता. यात शहरातील मेन रस्त्यावर तरुणांकडून दादागिरी करत नागरिकांना त्रास देणे, धमकावणे आणि महिलांशी गैरवर्तन करत होता. याबाबतच्या तक्रारी पोलिसात आलेल्या होत्या. या वरून पोलिसांनी सदर युवकाला ताब्यात घेतले. यानंतर त्याला चांगलीच अद्दल घडविली आहे. पोलिसांनी केलेल्या हा कारवाईमुळे या तरुणाची पुढे जाऊन असा प्रकार करण्याची हिम्मत होणार नाही. 

Shahada Police
समृद्धी महामार्गावर नियम धाब्यावर, दुचाकीवर तरुणाचा बिनधास्त प्रवास, व्हिडिओ समोर

कान पकडायला लावत फिरविले गावभर 

शहादा शहरात दादागिरी करणारा व महिलांना छेडछाड करणाऱ्या या युवकाला चांगलेच महाग पडले आहे. पोलिसांच्या कडक कारवाईच्या विळख्यात सापडला असून शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी त्याला कान धरून, हात जोडून शहरातील मुख्य रस्त्यावर लोकांसमोर फिरवले. या प्रकारामुळे त्या युवकाची मस्ती पूर्णपणे जिरली.

Shahada Police
Good News: सोलापूर- अहिल्यानगर आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, पाण्याची चिंता मिटली; उजणी धरण १०० टक्के भरलं

पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत 

दरम्यान मागील काही दिवसांपासून हा त्रास वाढलेला होता. परंतु पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचे शहरभर कौतुक होत असून अशा कृत्यांना आळा बसण्यासाठी ही घटना धडा ठरेल; अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी घेतलेली ही ठाम भूमिका आदर्श असल्याचे मत अनेकांनी मांडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com