Shahada Crime : शहादा आगारातील वाहकाचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी पुलाखाली जाळला मृतदेह

Nandurbar News : मोटारसायकलीने किराणा घेण्यास बाजारात गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली.
Shahada Crime
Shahada CrimeSaam tv
Published On

शहादा (नंदुरबार) : शहादा बस आगारातील वाहक तीन दिवसांपासून बेपत्ता होते. दरम्यान १६ मार्चला त्यांचा खून (Shahada) झाल्याची घटना रात्री उघडकीस आली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नांदर्डे- तऱ्हावद रस्त्यावर फरशी पुलाखाली जाळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. (Latest Marathi News)

Shahada Crime
Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार; मुलगी थोडक्यात बचावली

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा आगारातील वाहक राजेंद्र उत्तमराव मराठे (वय ५३) हे १४ मार्चला दुपारी चारला त्यांच्या मोटारसायकलीने किराणा घेण्यास बाजारात गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र ते कुठेही आढळून न आल्याने शहादा पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली. (Police) पोलिसांनीही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता कुठेही त्यांचा शोध लागला नाही. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shahada Crime
Crime News : घरफोडीतील सराईत गुन्हेगार ताब्यात; ५ गुन्ह्यांची उकल करत २० लाखांचा माल हस्तगत

दरम्यान, १६ मार्चला रात्री पावणेनऊच्या सुमारास नांदर्डे- तऱ्हावद रस्त्यावर फरशीपुलाखाली अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यांना या बेपत्ता घटनेबाबत (Crime News) शंका आली. त्यांनी तत्काळ बेपत्ता राजेंद्र मराठे यांच्या पत्नी मीनाक्षी, मुलगा प्रद्युम्न व मुलगी भावना यांना बोलावून घटनास्थळी नेले असता मृतदेहाचा अर्धवट जळालेला एक पाय, कपडे, पायाची नखे व तोंडाचा काही भाग दाखविला असता तो राजेंद्र मराठे यांचाच असल्याचे ओळखल्याने त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. तोंडाचा भाग कुत्र्यांनी घटनास्थळापासून काही अंतरावर नेल्याने शेळ्या चारणाऱ्या मुलाच्या निदर्शनास आल्यामुळे ही घटना उघडकीस आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com