Nandurbar News: म्हशीला वाचवायला गेले, होत्याचं नव्हतं झालं, पाण्यात बुडून दोघा सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत; काळीज पिळवटून टाकणारी घटना!

Nandurbar Latest News: नंदुरबार तालुक्यातील रनाळा गावात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येलाच घरातील कर्त्या मुलांना जीव गमवावा लागल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Nandurbar News: म्हशीला वाचवायला गेले, होत्याचं नव्हतं झालं, पाण्यात बुडून दोघा सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत; काळीज पिळवटून टाकणारी घटना!
Nandurbar Latest News: Saamtv
Published On

सागर निकवाडे, ता. २ सप्टेंबर २०२४

एकीकडे राज्यात बैलपोळा सणाची लगबग सुरू असतानाच नंदुरबार जिल्ह्यामधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. नाल्यात उतरलेल्या म्हैशी बाहेर काढताना बुडून दोन सख्ख्या दुर्दैवी भावांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Nandurbar News: म्हशीला वाचवायला गेले, होत्याचं नव्हतं झालं, पाण्यात बुडून दोघा सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत; काळीज पिळवटून टाकणारी घटना!
Maharashtra Politics: महायुतीमधील संघर्ष शिगेला! शिंदेसेनेच्या आमदाराचे राष्ट्रवादीवर दगाबाजीचे आरोप; रायगडमध्ये राजकारण तापलं

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाल्यात गेलेल्या म्हैशी बाहेर काढण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नंदुरबारमध्ये घडली. ज्ञानेश्वर धात्रक आणि विकी धात्रक अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. नंदुरबार तालुक्यातील रनाळा गावात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येलाच घरातील कर्त्या मुलांना जीव गमवावा लागल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रनाळे गावाच्या शिवारात सटवाईबारीपाडा बंधारा आहे. याच बंधाऱ्याच्या नाल्यातील पाण्यामध्ये त्यांच्या म्हैशी उतरल्या होत्या. म्हैशींना बाहेर काढण्यासाठी दोन्ही भाऊ गेले होते. यावेळी विकी धात्रक हा म्हैशी काढण्यासाठी नाल्यामध्ये उतरला मात्र पाणी जास्त असल्याने तो बुडू लागला.

Nandurbar News: म्हशीला वाचवायला गेले, होत्याचं नव्हतं झालं, पाण्यात बुडून दोघा सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत; काळीज पिळवटून टाकणारी घटना!
Crime News : धक्कादायक! IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू; विद्यापीठाच्या वसतिगृहात आढळला मृतदेह

भाऊ बुडत असल्याचे पाहून दुसरा भाऊही त्याला वाचवण्यासाठी नाल्यामध्ये उतरला. मात्र दोघेही पाण्यामध्ये बुडू लागले. याबाबत माहिती मिळताच लोकांनी धाव घेतली काहींनी त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडीही घेतली. मात्र मदत मिळण्यासाठी उशिर झाल्याने दोन्ही भावांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे दोघांपैकी एका भावाचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Nandurbar News: म्हशीला वाचवायला गेले, होत्याचं नव्हतं झालं, पाण्यात बुडून दोघा सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत; काळीज पिळवटून टाकणारी घटना!
Chirag Paswan News: सुसाट वेगात कार पळवली, दंड भरावा लागला, केंद्रीय मंत्र्याला वाहतूक विभागाचा दणका; प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com