Nandurbar News: महामार्गावर कोंडाईबारी घाटात अग्नी तांडव; ट्रक जळून लाखोंचे नुकसान

महामार्गावर कोंडाईबारी घाटात अग्नी तांडव; ट्रक जळून लाखोंचे नुकसान
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On: 

सागर निकवाडे

नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात चालत्या ट्रकमध्ये भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे मालट्रकच्या (Navapur) चाकाला लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Maharashtra News)

Nandurbar News
Bhandara Crime News: पत्नीची हत्या करून पती फरार; भंडाऱ्यात सहा दिवसात दुसरी घटना

नवापूर तालुक्‍यातून धुळे– सुरत मार्गाने ट्रक गुजरात राज्यातील वाकाचार रस्ता येथून वाळु भरून पिंपळगाव जिल्हा नाशिकच्या (Nashik) दिशेने जात होती. या दरम्‍यान अचानक आग लागली. ट्रकमध्‍ये शाॅर्टसर्किटमुळे क्षणातच ट्रकने पेट घेतला. सुरूवातीला ट्रकच्या केबिनमध्ये आगीने भडका घेतला. ट्रकचे केबिन लाकडी असल्याने क्षणार्धात संपूर्ण केबिन जळू लागले. आग लागल्याबरोबर ट्रक चालक विजय हरी ठाकरे (वय ४० रा. सटाणा जि. नाशिक) रस्त्याच्या बाजूला उभे करून आपला जीव वाचविला.

Nandurbar News
Shirdi News: दीड महिन्यात साईचरणी तब्बल ४७ कोटींचे दान

परंतु आगीचा वेग जास्त असल्याने आग नियंत्रणात न येता संपूर्ण ट्रक जळू लागला. यादरम्यान रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक सुरक्षा केंद्र चौकी पोलीस व विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन मिळेल त्या साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीत ट्रक जळून खाक झाला असून यात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.