Nandurbar Ration News
Nandurbar Ration NewsSaam tv

Nandurbar News: आदिवासी जिल्ह्यात आदिवासींना वेळेवर मिळेना रेशन

आदिवासी जिल्ह्यात आदिवासींना वेळेवर मिळेना रेशन
Published on

सागर निकवाडे

नंदूरबार : स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून रेशन धान्‍य दिले जात असते. परंतु, नंदुरबार (Nandurbar) जिल्‍ह्यातील आदिवासींना हक्‍काचे रेशन (Ration) वेळेवर मिळत नसल्‍याची स्‍थीती आहे. काहींना मिळते ते देखील वेळेवर मिळत नसल्‍याची ओरड जिल्‍ह्यात आहे. (Breaking Marathi News)

Nandurbar Ration News
Kalyan News: प्रवाशाची बॅग, मोबाईल हिसकावून पळाला; आरपीएफ कर्मचाऱ्यांनी पाठलाग करत पकडले

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर (Navapur) तालुक्यातील पांगराण येथील स्वस्त धान्य दुकानात नागरिकांना नियमित धान्य मिळत नाही. गावातील मोजक्याच लाभार्थींना धान्य दिले जाते, तेही नियमितपणे नाही. शिवाय स्वस्त धान्य दुकानदाराची अरेरावी ग्रामस्थांना सहन करावी लागत आहे. अशी तक्रार येथील ग्रामस्थांनी नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.

Nandurbar Ration News
Jalgaon Cyber Crime: ऑनलाईन ट्रेडींगच्या नावे साडे नऊलाखांचा गंडा

जिल्‍हाधिकारींकडे मांडली व्‍यथा

रेशन स्वस्त धान्य दुकानदाराची अनेक वेळा तक्रार करूनही पुरवठा अधिकाऱ्याचे दुर्लक्ष आहे. स्वस्त धान्य व कीट न मिळाल्याने आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे शेकडोच्या संख्येत ग्रामस्थ महिला यांनी आज जिल्‍हाधिकारी तथा तहसीलदार यांच्‍याकडे तक्रार केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com