Nandurbar: दहा शिक्षकांचे प्रमाणपत्र आढळले बोगस

दहा शिक्षकांचे प्रमाणपत्र आढळले बोगस
TET Exam Scam
TET Exam ScamSaam tv
Published On

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील माध्यमिक शाळा शिक्षकांबरोबरच जिल्हा परिषद, नगर पालिका व खासगी प्राथमिक शाळांमधील दहा शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र बोगस (TET Exam Scam) असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांचे वेतन व शालार्थ आयडी तत्काळ गोठविण्याचे आदेश प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक डॉ. दिनकर पाटील यांनी दिले आहेत. (Nandurbar News TET Exam Scam)

TET Exam Scam
Fraud: नोकरीचे आमिष दाखवत युवकाची सव्‍वापाच लाखाची फसवणूक

शिक्षक पात्रता (टीईटी) परिक्षेचे राज्यात सात हजार ८७४ जणांचे टीईटी प्रमाणपत्र बोगस असल्याचे आढळून आले आहे. त्यात प्राथमिक शाळांमधील ५७६ शिक्षकांचा समावेश आहे. याबाबत (Police) पोलिसांकडून संबधितांवर गुन्हे दाखल करून चौकशी केली आहे. त्यात नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण संस्थेतील १७ शिक्षकांबरोबरच आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नगरपालिका प्राथमिक शाळा व खासगी संस्थांचा प्राथमिक शाळेतील दहा शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे ऑगस्टपासून वेतन बंद करून त्यांचा शालार्थ आयडी गोठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिक्षकाचे नावे अशी

नीलेशकुमार छोटूलाल चौधरी, ज्योती अशोक पाटील, चेतन महेंद्र पाटील (सरदार पटेल प्राथमिक शाळा, नंदुरबार), दीपश्री राजेंद्र माळी, दीपिका हितेश शाह (आदर्श विद्या मंदिर, नंदुरबार), प्रदीप साहेबराव शिंदे (कै.हेमलताताई वळवी प्राथमिक विद्या मंदिर, विसरवाडी), नितीन मुरलीधर साळुंखे (व्ही. के. शाह प्राथमिक शाळा, नगरपालिका), गौरव प्रभाकर पाटील (विकास प्राथमिक विद्या मंदिर, शहादा), अबसर अहमद मोहम्मद हनिफ शेख (उर्दू प्राथमिक शाळा, शहादा), सुदाम बापू मुजगे (श्री मोती प्राथमिक विद्या मंदिर, तळोदा) यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com