नंदुरबार : कोरोनाच्या दोन वर्षानंतर शाळा नियमित सुरु झाल्यात मात्र एसटीच्या संपाचा फटका सर्वाधिक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत आहे. शाळेसाठी काही ठिकाणी विद्यार्थ्याना पायपीट करावी लागत आहे. तर काही जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचे चित्र आहे. खाजगी प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक अव्वाच्यासव्वा भाडे घेत असल्याने ग्रामीण भागातील शाळांमध्ये बस बंद असल्याने पालक आपल्या मुलींना पाठविण्यासाठी तयार नसल्याने मुलींची उपस्थिती शाळांमध्ये अत्यल्प दिसून येत आहे. (nandurbar-news-ST-strike-students-travling-Life-threatening-journey-in-some-places)
ग्रामीण भागाची लाइफ लाईन असणारी लालपरी धावल्याशिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थांना शाळांपर्यंत पोचण्यासाठीच्या अडचणी कमी होणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रमधील लाखो विद्यार्थ्यांचा विचार करून राज्य सरकार आणि एसटी कर्मचार्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मधला मार्ग काढावा हीच अपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
जीव धोक्यात टाकून प्रवास
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जवळील मोठ्या गावात आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. जिल्ह्यातील ३० हजारपेक्षा अधिक विद्यार्थी एसटीमधून प्रवास करत असतात. मात्र बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना चार ते पाच किलोमीटरची पायपिट करावी लागत आहे, तर काही ठिकाणी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यातल्या त्यात खाजगी प्रवासी वाहतूकदार यांनी केलेली भाडेवाढ विद्यार्थ्यांना परवडणारी नाही. तसेच पायपीट करत शाळेत गेल्याने थकवा येत असल्याने अभ्यास होत नसल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे.
दोन वर्षांनी शाळा सुरू पण
बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना पायी शाळेत यावे लागत आहे, पायी विद्यार्थ्यांना पाठविण्यास पालक तयार नाही. विशेष म्हणजे शाळामधील मुलींची उपस्थिती सर्वाधिक कमी आसल्याचे शिक्षक सांगतात. दोन वर्षांनी शाळा सुरु झाली पण आता विद्यार्थ्यांचा शिक्षणात एसटीचा संप आडवा येत असल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.