अल्टिमेटमही पडला फिका; धुळ्यातील एसटी कर्मचारी संपावर ठाम

अल्टिमेटमही पडला फिका; धुळ्यातील एसटी कर्मचारी संपावर ठाम
st strike
st strike
Published On

धुळे : राज्‍याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी अल्टिमेटम दिल्‍यानंतर देखील धुळ्यातील एसटी आंदोलक कर्मचारी आपल्या मागण्यांसह संपावर ठाम आहेत. यामुळे परिवहन मंत्र्यांचा अल्‍टीमेटम देखील आंदोलनापुढे फिका पडल्‍याचे चित्र पाहण्यास मिळाले. (dhule-news-The-ultimatum-also-fell-ST-workers-in-Dhule-insist-on-strike)

st strike
जळगावात एसटी कर्मचारी ठाम; वीस कर्मचाऱ्यांची केली सेवा समाप्‍ती

गेल्या महिन्याभरापासून राज्य शासनामध्ये एसटी महामंडळाचे विलगीकरण करण्यात यावे; यासाठी एसटी कर्मचारी आंदोलक संपावर आहेत. या दरम्यान शनिवार, रविवार व सोमवार या तीन दिवसांमध्ये परिवहन मंत्र्यांकडून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासंदर्भात अल्टिमेटम देण्यात आला होता. परंतु परिवहन मंत्र्यांच्या अल्टिमेटमनंतर देखील आपल्या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम असल्याचं दिसून येत आहे.

न्‍यायालयाच्‍या निर्णयावर पुढील दिशा

धुळे जिल्हात आतापर्यंत जवळपास ३०२ एसटी कर्मचारी आंदोलकांवर निलंबनाची कारवाई एसटी प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. या सर्व निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांनी आज संध्याकाळपर्यंत रुजू होणे प्रशासनाला अपेक्षित होते; परंतु परिवहन मंत्र्यांनी निलंबित कर्मचाऱ्यांनी तात्काळ रुजू होण्याचे आदेश दिल्यानंतर देखील एसटी आंदोलक कर्मचारी हे आपल्या मागणीवर व संपावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. २० तारखेला न्यायालयातर्फे जो निर्णय देण्यात येईल, त्या निर्णयावर पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाणार असल्याचे देखील आंदोलकांतर्फे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com