Mahavikas Aaghadi : सरकार विरोधात महाविकास आघाडीचे भिक मांगो; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी

Nandurbar News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू असे आश्वासन देत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले होते
Nandurbar Mahavikas Aghadi
Nandurbar Mahavikas AghadiSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदूरबार
: यंदा कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (Nandurbar) या शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिल्यानंतर देखील राज्य शासनाकडून अद्याप मदत मिळालेली नाही. या विरोधात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) आवाज उठवत आज भीक मँगो आंदोलन करण्यात आले. तसेच सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. (Breaking Marathi News)

Nandurbar Mahavikas Aghadi
Varandha Ghat Accident: वरंधा घाटात गाडी पलटी; प्रवाशी थोडक्यात बचावले

नंदुरबार जिल्ह्यात वातावरणातील बदल पाहता गेल्या खरीप हंगामात मान्सूनचं प्रमाण अत्यल्प होते. त्यातही पिक भरणीच्या दरम्यान पावसाने उघडीप दिल्याने पारंपारिक पिके व नगदी पिकांमध्ये उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू असे आश्वासन देत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले होते. परंतु दिवाळी संपूनही शेतकऱ्यांना दुष्काळी निधी मिळाला नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nandurbar Mahavikas Aghadi
Shirpur Accident: पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीत कोसळला; शिरपूरच्या सावळदे पुलावरील घटना

नंदुरबार जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी (NCP), शिवसेना यांच्यावतीने आज नंदुरबार जिल्ह्यात शिंदे- फडणवीस सरकार विरोधात भिक मागो आंदोलन करत निषेध नोंदविण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी; अशी मागणी करण्यात आली. शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com