Leopard In Nandurbar : बिबट्या, तरसचा नंदुरबारमधील वावर कॅमेऱ्यात कैद; परिसरात भीतीचे वातावरण

Nandurbar News : सातपुडा पर्वत रांगांमध्ये नेहमीच हिंस्त्र प्राण्यांचा वावर पाहण्यास मिळाला आहे. यामुळे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नंदुरबार शहर व परिसरात देखील हे प्राणी पाहण्यास मिळाले आहेत
Leopard In Nandurbar
Leopard In NandurbarSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदूरबार : नंदुरबार शहरातील पश्चिमेस असलेल्या माळीवाडा परिसरात काही दिवसांपासून हिंस्त्र प्राण्यांचा वावर (Nandurbar) दिसून आला आहे. यात याच परिसरात बिबट्या व तरसचा वावर कॅमेरात कैद झाला असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (Tajya Batmya)

Leopard In Nandurbar
Udaysing Padvi News : एकनाथ खडसेंसोबत भाजपात की शरद पवार गटासोबतच; आमदार उदयसिंग पाडवी यांनी स्पष्ट केली भूमिका

सातपुडा (Satpuda) पर्वत रांगांमध्ये नेहमीच हिंस्त्र प्राण्यांचा वावर पाहण्यास मिळाला आहे. यामुळे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नंदुरबार शहर व परिसरात देखील हे प्राणी पाहण्यास मिळाले आहेत. सद्या उन्हाळा असल्याने डोंगर परिसरात पाण्याची कमतरता आहे. शिवाय जंगल परिसर मोकळा असल्याने येथे शिकार देखील मिल नाही. यामुळे (Leopard) बिबट्यासह वन्य प्राणी शहर, गाववस्तीकडे पाणी व शिकारीच्या शोधात येत आहेत. अशाच प्रकारे नंदुरबार शहर परिसरात त्यांचा वावर असल्याचे पाहण्यास मिळाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Leopard In Nandurbar
Malegaon Crime News : जुन्या वादातून तरुणाचा खून; संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

वाहनासमोर आला बिबट्या 

काही दिवसांपूर्वी हिंस्त्र प्राण्याकडून काही पाळीव प्राण्यांवर हल्ला झाला होता. गस्तीवर असलेल्या पोलीस वाहनांसमोर अचानक बिबट्या आल्याने पोलीस वाहनातील कर्मचाऱ्यांनी बिबट्याला कॅमेऱ्यात कैद केले. परिसरात हिंसा प्राण्यांच्या वावर वाढल्याने शेतकऱ्यांसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com